इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने मायगव्हकडून, 'युवा प्रतिभा - गायन प्रतिभा शोध' स्पर्धेचे आयोजन

Posted On: 09 MAY 2023 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

विविध गायन शैलींमधील नवीन आणि तरुण प्रतिभावंताचा शोध घेऊन तसेच राष्ट्रीय स्तरावर समाजातील प्रत्येक घटकात भारतीय संगीताचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने मायगव्ह बुधवार, 10 मे 2023 रोजी युवा प्रतिभा – गायन प्रतिभा स्पर्धेचा प्रारंभ करत आहे.

स्पर्धेत प्रारंभिक फेरीत अर्ज सादर करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

गायन प्रतिभा शोध' ही देशभरातील नागरिकांसाठी त्यांची गायन प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्याची आणि राष्ट्रीय ओळख मिळवण्याची एक अनोखी संधी आहे. जर एखाद्याला नव्या भारताचा उदयोन्मुख गायक कलाकार किंवा संगीतकार व्हायचे असेल, तर तो/ ती युवा प्रतिभा – गायन प्रतिभा शोध मध्ये सहभागी होऊ शकतो आणि विविध शैलींमध्ये आपले मधुर आवाजातील गाणे सादर करु शकतो:

  • लोकगीते
  • देशभक्तीपर गाणी
  • समकालीन गाणी

कसे सहभागी व्हावे:

  1. https://innovateindia.mygov.in/ वर लॉग इन करा
  2. ही स्पर्धा सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
  3. सर्व नोंदणी अर्ज पोर्टलद्वारेच दाखल केले पाहिजेत. इतर कोणत्याही पद्धतीने दाखल केलेले अर्ज मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. सहभागींना ते गात असतानाच एक व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल आणि YouTube (असूचीबद्ध लिंकद्वारे ), गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स इत्यादी द्वारे त्यांची प्रवेशिका सादर करावी लागेल. त्यापूर्वी  दिलेल्या लिंकचा वापर करता येणे शक्य आहे याची खात्री करावी . लिंक वर प्रवेश मंजूर न केल्यास प्रवेशिका आपोआप अपात्र ठरेल.
  5. या स्पर्धेत हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील गाणी सादर करता येतील .
  6. एका स्पर्धकाला स्पर्धेत फक्त एकदाच भाग घेता येईल.
  7. नवी दिल्लीतील होणाऱ्या अंतिम सोहळ्यात (प्रत्यक्ष कार्यक्रमात) या स्पर्धेतील पहिल्या 3 विजेत्यांची घोषणा मध्ये केली जाईल.

पुरस्कार आणि ओळख:

  • पहिला विजेता: 1,50,000/- रुपये रोख + चषक + प्रमाणपत्र
  • दुसरा विजेता: 1,00,000/- रुपये रोख+ चषक + प्रमाणपत्र
  • तिसरा विजेता: 50,000/- रुपये रोख + चषक + प्रमाणपत्र
  • त्यापुढील 12 स्पर्धकांना प्रत्येकी 10,000 रुपयांचे  रोख बक्षीस दिले जाईल. 

मेंटॉरशिप: टॉप 3 विजेत्यांना 1 महिन्याच्या कालावधीसाठी मेंटॉरशिप स्टायपेंडसह मार्गदर्शन केले जाईल.

नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्यासाठी मायगव्ह आमंत्रित करत आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://innovateindia.mygov.in/singing-challenge/या संकेतस्थळाला भेट द्या.

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922851) Visitor Counter : 162


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil , Telugu