संरक्षण मंत्रालय
प्रादेशिक सेनेच्या महिला अधिकाऱ्यांना नियंत्रण रेषेजवळ तैनात करण्यास संरक्षण मंत्र्यांनी दिली मान्यता
Posted On:
07 MAY 2023 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2023
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रादेशिक सेनेच्या (TA) महिला अधिकार्यांच्या नियंत्रण रेषेजवळील प्रादेशिक सैन्याच्या अभियंता रेजिमेंटमध्ये आणि प्रादेशिक सैन्याच्या समूह मुख्यालय/ नवी दिल्ली येथील प्रादेशिक सैन्य महासंचालनालयात कर्मचारी अधिकारी म्हणून संघटनात्मक गरजेनुसार तैनात करण्यास मान्यता दिली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या रोजगाराची व्याप्ती वाढवणे तसेच त्यांच्या व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करणे हा या प्रगतीशील धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या महिला अधिकारी आता त्यांच्या पुरुष समकक्षांप्रमाणेच युनिट्स आणि नियुक्तीच्या विस्तृत श्रेणीमध्ये सेवा आणि प्रशिक्षण प्राप्त करतील.
प्रादेशिक सेनेने 2019 पासून इकोलॉजिकल टास्क फोर्स युनिट्स, प्रादेशिक सेना ऑईल सेक्टर युनिट्स आणि प्रादेशिक सेना रेल्वे इंजिनीअर रेजिमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती सुरू केली. या कालावधीत मिळालेल्या अनुभवाच्या आधारे प्रादेशिक सेनेमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी नोकरीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रादेशिक सेना ही नागरिक सैनिकांचे सैन्य दल या संकल्पनेवर आधारित आहे. या अधिकाऱ्यांना नागरी जीवनात इतर सेवांमध्ये कार्यरत असताना मूलभूत लष्करी कौशल्यांचे वार्षिक प्रशिक्षण दिले जाते.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922424)
Visitor Counter : 263