युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

अनुराग सिंह ठाकूर आणि योगी आदित्यनाथ यांनी आज लखनौमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा 2022 चे बोधचिन्ह, शुभंकर, मशाल, गीत आणि जर्सी यांचे केले लोकार्पण

Posted On: 05 MAY 2023 6:29PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज लखनौमध्ये बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत, संपूर्ण उत्साहात आणि जल्लोषात, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा उत्तर प्रदेश 2022 चे अधिकृत बोधचिन्ह, शुभंकर, मशाल,स्पर्धागीत आणि जर्सी यांचे लोकार्पण केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित होते.

आज मला खूप समाधान मिळत आहे की आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी कल्पित केलेली खेलो इंडिया चळवळ आज एक क्रांती बनली आहे आणि ही क्रांती आज उत्तर प्रदेश या भारतातील सर्वात मोठ्या राज्यात पोहोचली आहे, असे अनुराग सिंह ठाकूर यावेळी बोलताना म्हणाले. खेळ हा जीवनातील सर्वात कठीण धडे शिकण्याचा एक उत्तम मार्ग आहे, हे या क्रीडास्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यापीठ क्रीडापटूंना समजेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकार्पण सोहळ्याची सुरुवात सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी बोधचिन्हाचे अनावरण करण्यापूर्वी उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री गिरीश चंद्र यादव, यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली. यानंतर, प्रसिद्ध गायक पलाश सेन यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले खेलो इंडिया हर दिल में देश या क्रीडास्पर्धा गीताचे अनावरण अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर ठाकूर यांनी अधिकृत क्रीडास्पर्धा जर्सीचे अनावर केले. उत्तर प्रदेशातील ललित उपाध्याय, सुधा सिंग आणि दिव्या काकरन यांसारख्या प्रतिष्ठीत क्रीडापटूंनी ही जर्सी परिधान केली आणि उत्साहाने सर्वांना दाखवली.

या खेळाचा शुभंकर जितू द बाराशिंगा हा अनोखा उत्साही राज्य प्राणी जो गर्व से गौरव ला मूर्त रूप देतो त्याचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमात शेवटी खेळाच्या मशालीचे लोकार्पण करण्यात आले. ही मशाल उत्तर प्रदेशाचे प्रसिद्ध क्रीडापटू ललित उपाध्याय, वंदना कटारिया, सुधा सिंग, विजय यादव, दानिश मुजतबा यांनी मंचावर आणली. या क्रीडापटूंनी ही मशाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केल्यावर मुख्यमंत्र्यांनी ती ॲनामॉर्फिक स्क्रीनवर प्रज्वलित केली आणि नंतर  चार दिशांना जाणार असलेल्या चार रिलेचा प्रारंभ करण्यासाठी पार्किंग एरियाकडे त्या रवाना करण्यात आल्या.

25 मे ते 03 जून 2023 या कालावधीत अधिकृतपणे आयोजित या क्रीडास्पर्धेत 200 भारतीय विद्यापीठांमधील 4000 हून अधिक खेळाडू 21 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. या क्रीडास्पर्धेचा उद्घाटन समारंभ 25 मे 2023 रोजी लखनौ येथे होणार आहे.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922185) Visitor Counter : 175