राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 04 MAY 2023 5:14PM by PIB Mumbai

 

बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका संदेशात त्यांनी म्हटले आहे की, बुद्धपौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, मी देशवासियांना  आणि जगभरातील भगवान बुद्धाच्या अनुयायांना मनापासून शुभेच्छा देते.

करूणेचे प्रतीक भगवान  बुद्ध यांनी आपल्याला ज्ञान, सहिष्णुता आणि सदाचाराचा  मार्ग दाखवला आहे. त्यांची साधी आणि परिणामकारक शिकवण आपल्याला प्रेम, सत्य आणि अहिंसेचा मार्गावर चालण्याची प्रेरणा देते . भगवान बुद्ध यांचे जीवन आत्मनियंत्रण आणि स्वयंशिस्त यांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांची शिकवण आजही मानवतेला मार्गदर्शन करत आहे.

या पवित्र दिनी, आपण भगवान बुद्धांची शिकवण  मन, वाचा, कृतीद्वारे  आत्मसात करून वैभवशाली राष्ट्र उभारण्याचा संकल्प  करू या."

***

S.Kane/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922011) Visitor Counter : 115