पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
'फ्रॉम ट्रॅश टू ट्रेजर': कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी अभिनव उपायांवर हॅकेथॉन
Posted On:
04 MAY 2023 4:05PM by PIB Mumbai
पर्यावरणासाठी जीवनशैली (लाईफ -LiFE)अभियान आणि चक्राकार अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे या संदेशापासून प्रेरणा घेऊन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ 14 मे 2023 (रविवार) रोजी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन 'वेस्ट टू वेल्थ आयडिएशन हॅकेथॉन' (कचऱ्यातून संपत्तीनिर्मिती कल्पनाशक्ती हॅकेथॉन) आयोजित करत आहे. यासाठी नोंदणी सध्या https://cpcb.nic.in/w2w-hackathon-cpcb/# यावर सुरु आहे.
(अ ) प्लास्टिक कचरा (ब ) इलेक्ट्रॉनिक कचरा (क ) बॅटरी कचरा (ड ) पिकांच्या अवशेषांचा कचरा यांसारख्या वास्तविक कचरा व्यवस्थापन आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यासपीठ प्रदान करण्यासाठी हा एक देशव्यापी कार्यक्रम आहे. यामुळे त्यांच्यात कचरा व्यवस्थापनाची समज निर्माण करण्यास आणि कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी अभिनव उपाय सादर करण्यास साहाय्य करेल.
हॅकेथॉनमधील प्रत्येक कचरा प्रकारात विद्यार्थ्यांना 3.6 लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. हॅकाथॉनच्या दिवशी म्हणजेच 14 मे, 2023 (रविवार), कचऱ्याशी संबंधित चार प्रकारांमध्ये प्रत्येकी एक समस्या सीपीसीबी अर्थात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर सकाळी 09:00 वाजता दिली जाईल . विद्यार्थ्यांनी त्यावरील संबंधित मूळ उपाय संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत दिलेल्या नमुन्यात w2w.cpcb[at]gov[dot]in ईमेल करणे आवश्यक असेल. प्रत्येक कचरा प्रकारात सर्वोत्कृष्ट मूळ कल्पनांना 50,000, 25,000, आणि 15,000 रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. यासह, निवडलेल्या कल्पना साकारण्यासाठी पाठबळ, उद्योग संधी आणि मंडळाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. पात्रता, प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि समस्या व्याप्ती यासंबंधी अधिक तपशीलांसाठी, कृपया https://cpcb.nic.in/w2w-hackathon-cpcb/ पहा .
नोंदणीची अंतिम तारीख 12 मे 2023 (शुक्रवार) आहे.
संपर्क
डॉ प्रशांत गर्गवा
सदस्य सचिव, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
परिवेश भवन, पूर्व अर्जुन नगर, दिल्ली 110092, भारत
mscb.cpcb[at]gov[dot]in
(+91) 011- 43102207, 22307078, 22303655
***
S.Kane/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922004)
Visitor Counter : 171