पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीकरणीय ऊर्जा विस्तारासाठी जागतिक अनिवार्य लक्ष्ये आणि जागतिक उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात कपात करण्याची गरज यावर  पीटर्सबर्ग हवामान संवादात  व्यापक सहमती झाल्याची भूपेंद्र  यादव यांनी दिली माहिती

Posted On: 04 MAY 2023 12:38PM by PIB Mumbai

 

कॉप 28 मधील संयुक्त निर्णयांसाठी पाया घालण्याच्या दिशेने काम करणाऱ्या प्रतिनिधींसोबत बर्लिन येथे पीटर्सबर्ग हवामान संवाद झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे.  नवीकरणीय ऊर्जा विस्तारासाठी जागतिक अनिवार्य लक्ष्ये आणि जागतिक उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात कपात करण्याची गरज यावर व्यापक सहमती झाल्याची माहिती त्यांनी ट्विट संदेशांद्वारे दिली आहे.

भारताने चर्चेत आपली बाजू ठामपणे मांडल्याचे यादव यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, कोणीही वंचित राहता कामा नये, या तत्त्वानुसार न्याय्य, परवडणाऱ्या  आणि सर्वसमावेशक ऊर्जा परिवर्तनासाठी पाठबळाची आवश्यकता ओळखण्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आल्याचे,ते म्हणाले.

स्वच्छ ऊर्जेचा  अवलंब करताना, विद्यमान ऊर्जा प्रणालीवर अवलंबून असलेली स्थानिकांची उपजीविका  आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचे  संरक्षण करण्यासाठी, अर्थव्यवस्थेत विविधता आणणे आणि उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे यादव यांनी सांगितले. 

गरीबी निर्मूलनासह विकसनशील देशांच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांवर हवामान बदलाचे परिणाम, कृती आणि प्रतिसाद कसा प्रभाव पाडतात यावर ग्लोबल स्टॉकटेक (ग्लोबल स्टॉकटेक हा पॅरिस कराराचा एक मूलभूत घटक असून याचा  उपयोग कराराच्या  अंमलबजावणीवर देखरेख  ठेवण्यासाठी आणि सहमत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो.) निष्पत्तीमध्ये लक्ष केंद्रित केले पाहिजे, याकडे यादव यांनी लक्ष वेधले.

ग्लोबल स्टॉकटेक निष्पत्तीमध्ये शाश्वत जीवनशैली तसेच शाश्वत उपभोग याविषयी संदेश देण्यासाठी राष्ट्रीय निर्धारित योगदान  आणि वर्धित आंतरराष्ट्रीय सहकार्याची पुढील फेरीची माहिती दिली पाहिजे, असे यादव यांनी सांगितले.

***

M.Chopade/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1921913) Visitor Counter : 170