युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मणीपूर विद्यापीठ 4, मे 2023 रोजी "सामायिक भविष्य : शासन आणि लोकशाहीत युवावर्गाची भूमिका" या विषयावर Y20 चर्चासत्र आयोजित करणार


या चर्चासत्रात 26 परदेशी पॅनेल सदस्य आणि प्रतिनिधींसह सुमारे 550 सदस्य होणार सहभागी

Posted On: 03 MAY 2023 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2023

भारताच्या Y20 शिखर  परिषदेच्या पाच संकल्पनांपैकी एक असलेल्या  "सामायिक  भविष्य :  शासन आणि लोकशाहीत युवावर्गाची भूमिका" या विषयावर मणीपूर विद्यापीठ  4, मे 2023 रोजी Y20 चर्चासत्र आयोजित करणार आहे.

जी 20 शिखर परिषदेची व्याप्ती  सर्व स्तरांवर जास्तीतजास्त पोहोचावी याकरता हे चर्चासत्र युवा वर्गावर लक्ष केंद्रित करेल. या चर्चासत्राच्या माध्यमातून मणीपूरच्या सर्व सोळा जिल्ह्यांमध्ये पोहोचण्याचे  केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या परिषदेत 550 सदस्य होणार सहभागी असून 26 परदेशी पॅनेल सदस्य आणि प्रतिनिधी, मणीपूरच्या बाहेरील 38 प्रतिनिधी आणि पॅनेल सदस्य आणि मणीपूरमधील 69 जणांचा यात समावेश असेल. या चर्चासत्रात मणीपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील सुमारे  70 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मणीपूर हे एक लहान राज्य असले तरी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात या राज्याचे योगदान बहुमोल आहे असे मणीपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.एन लोकेंद्र सिंह यांनी सांगितले. मणीपूर मधील  युवक युवती त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत.  "आमच्या विद्यार्थ्यांच्या अशा नेत्रदीपक कामगिरीमुळेच भारत सरकारने आम्हाला या चर्चासत्राचे आयोजन करण्याची संधी दिली" असे कुलगुरू म्हणाले.

भारत जी 20 परिषदेचे 18वे अध्यक्षपद भूषवत आहे, आणि जी 20 सदस्य राष्ट्र, जागतिक व्यापारातील  85% भाग नियंत्रित करतात, त्यामुळे जी 20 राष्ट्रांनी घेतलेल्या निर्णयांना सर्वसाधारणपणे जागतिक सहमती प्राप्त होते, असे चर्चासत्राचे समन्वयक प्रा.डब्लू.चंदबाबू सिंग यांनी सांगितले.

भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात Y20 सह 11 प्रतिबद्धता गट आहेत, आणि Y20 अंतर्गत पाच उप संकल्पना असून "सामायिक  भविष्य :  शासन आणि लोकशाहीत युवावर्गाची भूमिका" ही त्यापैकी एक आहे.

भारतीय युवकांचा आवाज, त्यांचे मत  देशांतर्गत आणि जागतिक व्यासपीठांवर ऐकले जावे यासाठी आणि माहिती प्रदान करण्यासाठीया चर्चासत्राच्या शिफारशींवर सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या नियोजित अंतिम जी 20 परिषदेत, चर्चा होईल.

राज्यातील युवक-युवतींच्या भवितव्याच्या हितासाठी, या चर्चासत्रात, आंदोलन किंवा बंदच्या स्वरुपात कोणताही अडथळा आणू नये, असे आवाहन Y20 शिखर  परिषदेचे अध्यक्ष हेमाकुमार यांनी राज्यातील संघटना आणि जनतेला केले आहे.

 

  

 

 

 

 

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921693) Visitor Counter : 152