दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ‘दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुलभता’ संबंधी शिफारशी जारी केल्या

Posted On: 02 MAY 2023 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आज 'दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील व्यवसाय सुलभता' संबंधी  शिफारशी जारी  केल्या.

मागील दशकात व्यवसाय सुलभता हे सरकारच्या लक्षित क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. व्यवसाय सुलभता हे  व्यवसाय आणि उद्योग  सक्षम करणे आवश्यक  असल्याच्या वस्तुस्थितीचे द्योतक आहे. केंद्र सरकार सर्व क्षेत्रांमध्ये  प्रत्येक टप्प्यावर व्यवसायासाठी वातावरण सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे.'दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रांचा नियामक म्हणून, या क्षेत्रात व्यवसायासाठी वातावरण सुधारण्याची जबाबदारी ट्रायवर आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 8 डिसेंबर 2021 रोजी "'दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुलभता ' या विषयावर स्वतःहून एक सल्लापत्र जारी केले .पूर्वी, प्राधिकरण प्रामुख्याने दूरसंचार विभाग आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयशी संबंधित व्यवसाय सुलभता विषयक सल्ला घेत असे. मात्र सध्या त्याची व्याप्ती अनेक मंत्रालये/विभागांपर्यंत आहे.  व्यवसाय सुलभतेसाठी  'सरकारच्या संपूर्ण' दृष्टिकोनासह प्रारंभापासून शेवटपर्यंत विविध प्रक्रियांचा सर्वसमावेशक आढावा आवश्यक आहे.  सर्व आंतर-मंत्रालयीन मंजुरीसाठी एक अर्ज –एक खिडकी  पुरेशी असेल.

संबंधितांकडून सल्लापत्रावर अनुक्रमे 9 फेब्रुवारी 2022 आणि 23 फेब्रुवारी ,2022 पर्यंत लेखी स्वरूपात सूचना आणि हरकती  मागवण्यात आल्या होत्या. प्राधिकरणाला विविध हितधारकांकडून 45 सूचना  आणि चार हरकती प्राप्त झाल्या.  या सर्व सूचना  आणि हरकती  ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सल्लापत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर 21 एप्रिल 2022 रोजी ऑनलाइन पद्धतीने खुली चर्चा  देखील आयोजित करण्यात आली होती.

व्यवसाय सुलभतेवरील या सर्वसमावेशक अभ्यासात  सखोल विश्लेषण आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, अनुपालन प्रक्रिया, माहितीचे सादरीकरण आणि परवान्यांच्या संपूर्ण टप्प्यातील देय प्रक्रिया यांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रत्येक प्रक्रियेसाठी ‘काय’ आणि ‘का’ असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आपली परंपरा कायम राखत ट्रायने आपल्या संकेतस्थळावर सर्व सूचना आणि हरकती  प्रदर्शित केल्या.  काही धोरणकर्त्यांनी हितधारकांच्या समस्यांचा सक्रीय  पाठपुरावा केला ही  आनंदाची बाब आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची  टीम संबंधित अधिकाऱ्यांबरोबर काम करत आहे. सहकार्य आणि सामंजस्याच्या या दृष्टिकोनामुळे धोरण निर्मात्यांना अनावश्यक प्रक्रिया/माहिती ओळखण्यास मदत होत आहे. दूरसंचार विभाग आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यापूर्वीच काही सुधारणा केल्या आहेत. हे उपक्रम कौतुकास्पद आहेत.

व्यवसाय सुलभता ही एक-वेळची प्रक्रिया नसून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे , या शिफारशींद्वारे,भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने  व्यवसाय सुलभतेवर  लक्ष केंद्रित करून स्थायी समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे . दोन्ही क्षेत्रांच्या सुव्यवस्थित वाढीसाठी पूरक परिस्थिती निर्माण करण्यासाठी ते वचनबद्ध आहे.व्यवसाय सुलभतेबाबत प्रक्रिया-आधारित दृष्टीकोन निर्माण  करण्याचा शिफारशींचा प्रयत्न आहे. अशी परिसंस्था वेळोवेळी आढावा आणि अधिक सुधारणांसाठी मार्ग सुकर  करेल अशी ट्रायला आशा आहे.  या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी केल्यास या क्षेत्रांच्या वाढीला चालना मिळेल.

या शिफारशींची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –

'दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुलभता संबंधी शिफारशींचा संपूर्ण मजकूर ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला  आहे. स्पष्टीकरण/माहिती हवी असल्यास, अनिल कुमार भारद्वाज, सल्लागार (B&CS) यांच्याशी advbcs-2@trai.gov.in किंवा दूरध्वनी क्रमांक +91-11-23237922 वर संपर्क साधता येईल.

 

 

 

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1921494) Visitor Counter : 188