संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्र्यानी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मालदीवला सुपूर्द केली एक जलद गस्ती नौका आणि सैन्यवाहक मारकक्षमता असलेले जहाज (लँडिंग क्राफ्ट असॉल्ट जहाज)


हिंद महासागर क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी सामायिक वचनबद्धतेचे हे प्रतीक

संरक्षण मंत्र्यांनी मालदीवच्या राष्ट्रपतींची घेतली भेट,संरक्षण संबंध आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर केली चर्चा; मालदीवला भारताचा नेहमीच पाठिंबा राहील असे दिले आश्वासन

Posted On: 02 MAY 2023 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर आहेत. त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी  02 मे 2023 रोजी मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाला (एमएनडीएफ) एक जलद गस्ती नौका आणि सैन्यवाहक मारक क्षमता असलेले जहाज (लँडिंग क्राफ्ट असॉल्ट जहाज) सुपूर्द केले. ही जलद गस्ती नौका किनारपट्टी भागात जलद गतीने गस्त घालू शकेत तसेच  पाळत ठेवू शकते. एमएनडीएफ तटरक्षक दल नौका ‘हुरावी’ म्हणून ती तैनात करण्यात आली.यावेळी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी उपस्थित होते.

सुपूर्द केलेली दोन ‘मेड इन इंडिया’ संरक्षण उत्पादने हे हिंद महासागर क्षेत्रातील (आयओआर) शांतता तसेच सुरक्षिततेसाठी भारत आणि मालदीव यांच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. भारताने मजबूत संरक्षण परिसंस्थेच्या माध्यमातून भागीदार देशांच्या क्षमता वाढीस आणखी पाठबळ देण्यासाठी आपली उत्पादन क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे असेही ते म्हणाले.

भारत मित्र देशांना वृद्धिंगत संरक्षण भागीदारीचे निमंत्रण देत आहे. ही भागीदारी त्यांच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि क्षमतांना अनुकूल आहे.आम्हाला मैत्रीचे संबंध निर्माण करायचे आहेत. त्याद्वारे परस्परांकडून शिकता येईल,एकत्र वाढता येईल आणि सर्वांसाठीच लाभाची परिस्थिती निर्माण करता येईल.  मालदीवला पाठिंबा देण्याची भारताची वचनबद्धता वेळोवेळी अधिक मजबूतच होत राहील, असे संरक्षण मंत्री म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी आदल्या दिवशी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भेट घेतली. सध्या सुरू असलेले प्रकल्प आणि संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मालदीवला विविध क्षेत्रांमध्ये भारताने सतत मदत आणि पाठबळ दिल्याबद्दल मालदीवच्या राष्ट्रपतींनी कृतज्ञता व्यक्त केली. मालदीवला भारताबद्दल आदर असल्याचे ते म्हणाले.हे संबंध दृढ करण्यासाठी मालदीव वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921397) Visitor Counter : 150