पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यटन उद्योगात स्टार्ट-अप्स आणि उद्योगसमूहांच्या एकत्रित संस्था यासाठी गुंतवणुकीच्या मोठ्या संधी: जी. किशन रेड्डी यांचे प्रतिपादन

Posted On: 28 APR 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2023

 

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने आयोजित होणाऱ्या पहिल्या आगामी जागतिक पर्यटन गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेसाठी प्रवास आणि पर्यटन उद्योगातील हितसंबंधितांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने 26आणि 27 एप्रिल रोजी नवी दिल्ली आणि मुंबई येथे रोड शोजचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन, सांस्कृतिक आणि पूर्वोत्तर विभाग मंत्री, जी. किशन रेड्डी यांनी या  दोन रोड शोचे अध्यक्षस्थान भूषविले.

रोड शोमध्ये उपस्थितांना संबोधित करताना जी किशन रेड्डी म्हणाले, "भारतीय पर्यटन उद्योगांतील अनेक अनुभवांचा विचार करता, निरामयतेसाठी पर्यटन, साहसी पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन (इको-टुरिझम), ग्रामीण पर्यटन, अध्यात्मिक पर्यटन आणि इतर अनेक विशेष प्रकारच्या पर्यटनांसाठी विविध राज्ये आणि केंद्र यांतील दोन्ही सरकार  आर्थिक विकासातील पर्यटनाची महत्वपूर्ण भूमिका निभावून शकतात. म्हणूनच आर्थिक विकासासाठी विशेष करून हॉटेल्स आणि इतर पर्यटन-संबंधित क्षेत्रांत पायाभूत सुविधांमध्ये,खाजगी गुंतवणूक होणे  महत्त्वाचे आहे.

दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांनी या क्षेत्राचे विहंगावलोकन केले आणि भविष्यात या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधीबद्दल आपले विचार त्यांनी सामायिक केले.

27 एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या रोड शोमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये  महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव श्री सौरभ विजय (पर्यटन),गुजरात सरकारचे सचिव (पर्यटन),श्री हरीत शुक्ला,मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, श्री विवेक श्रोत्रिय,राजस्थान सरकारच्या पर्यटन मंडळाचे सहसंचालक पवन जैन यांचा समावेश होता; तसेच या सर्वांनी देखील या कार्यक्रमादरम्यान आपले विचार  व्यक्त केले.

मुंबईतील रोड शोमध्ये पर्यटन उद्योगातील प्रमुख मान्यवरांनी  जी. किशन रेड्डी यांच्याशी  संवाद साधला.

"पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनातून प्रेरित होऊन, सरकार मिशन मोडमध्ये भारतातील पर्यटनाच्या क्षेत्रात शाश्वत विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी समर्पितपणे काम करत आहे," 

असे जी.किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितले. देशांतर्गत आणि परदेशातून येणार्‍या पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत.

आगामी जागतिक पर्यटन गुंतवणूक परीषदेचे (ग्लोबल टूरिझम इन्व्हेस्टर्स समिट) उद्दिष्ट, भारतातील प्रवास आणि पर्यटन क्षेत्र हे गुंतवणुकीचे एक आदर्श स्थान म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि गुंतवणूकदारांना तसेच केंद्र आणि राज्य सरकारांना गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यासाठी  एक मंच प्रदान करणे हे आहे. पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी  गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यायोग्य तयार प्रकल्पांच्या संदर्भात सामर्थ्य आणि वैशिष्ट्य दर्शविण्याची संधी सहभागी राज्यांना असेल. भारताच्या पर्यटन उद्योगाचा विकास जलद गतीने व्हावा आणि विकासाला चालना देण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यात भरीव  चर्चा आणि सहकार्य  देखील ही शिखर परिषद मिळवून देईल अशी आशा आहे.

पहिल्या जागतिक पर्यटन गुंतवणूकदार परीषद (GTIS) 2023 चे आयोजन गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा यांतील सहभागीदार म्हणून इन्व्हेस्ट इंडिया आणि उद्योग भागीदार म्हणून भारतीय उद्योग महासंघ  यांच्या सहकार्याने केले जात आहे. भारतीय पर्यटन  आणि आदरातिथ्य क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी, जागतिक आणि देशांतर्गत संबंधीतांसाठी सामायिक  व्यासपीठ प्रदान करणे हे या परीषदेचे उद्दिष्ट  आहे.भारताच्या G 20 अध्यक्षपदाच्या अखत्यारीत आयोजित करण्यात आलेल्या,या शिखर परिषदेद्वारे द्विपक्षीय/बहुपक्षीय गुंतवणुकीसह इतर क्षेत्रांतही भारतीय पर्यटन उद्योग उत्पादनांसाठी सुयोग्य संधी उपलब्ध करीत G20 देशांतील गुंतवणूकदारांसाठी एक उपयुक्त व्यासपीठ प्रदान करत आहे.

 

* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920621) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu