माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मन की बात@100 वर आधारित राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या सन्माननीय व्यक्तींना वैशिष्ठ्यपूर्ण स्थानिक उत्पादने भेटस्वरुपात देण्यात आली

Posted On: 27 APR 2023 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2023

 

मन की बात@100 वर आधारित राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या सन्माननीय व्यक्ती आणि विषय तज्ज्ञांना देशभरातील कारागिरांनी तयार केलेली वैशिष्ठ्यपूर्ण  स्थानिक उत्पादने भेटस्वरुपात देण्यात आली. विविध पारंपरिक कला प्रकार पुनरुज्जीवीत केल्याबद्दल, पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या  विविध भागांमध्ये  या कलाकारांची प्रशंसा केली होती. 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना गोवा येथील चित्रकार सागर मुळे यांनी तयार केलेले अद्वितीय कावी पद्धतीचे चित्र भेटीदाखल देण्यात आले. कोकण भागातील कावी पद्धतीच्या चित्रकलेला आधुनिक स्वरुपात नव्याने सादर करण्याचे काम सागर मुळे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2016 मध्ये सादर झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये सागरच्या या प्रयत्नांचे कौतुक केले होते. 

परिषदेत  उपस्थित असलेल्या इतर सन्माननीय व्यक्तींना आणि विषय तज्ज्ञांना  ओदिशा येथील भाग्यश्री साहू या चित्रकर्तीने दगडावर काढलेली पट्टचित्रे आणि आंध्रप्रदेशातील सी.व्ही.राजू या कलाकाराने तयार केलेली एटीकोप्पका प्रकारची लाकडी खेळणी अशा विविध वस्तू भेटस्वरूप देण्यात आल्या.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात काल मन की बात @100 वर आधारित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920307)