संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युनायटेड किंगडम मधील सॅलिसबरी प्लेन्स येथे “अजेय योद्धा – 2023” या भारत-युके संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन

Posted On: 27 APR 2023 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2023

 

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील "अजेय योद्धा -23" या  7 व्या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन  27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत युनायटेड  किंगडममधील सॅलिसबरी प्लेन्स येथे करण्यात आले आहे. ''अजेय योद्धा'' हा लष्करी सराव युनायटेड किंगडमसोबतचा द्विवार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे.  हा लष्करी सराव  युनायटेड  किंगडम  आणि भारत आळीपाळीने आयोजित करतात. मागील  लष्करी सराव हा भारतात उत्तराखंड मधील  चौबटिया  येथे ऑक्टोबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आला होता.

युनायटेड किंगडमच्या 2  रॉयल गोरखा रायफल्सचे जवान  आणि भारतीय लष्कराच्या  बिहार रेजिमेंटचे जवान  या सरावात सहभागी होत आहेत.भारतीय लष्कराची तुकडी 26 एप्रिल 2023 रोजी भारतीय हवाई दलाच्या सी -17 विमानाने स्वदेशी शस्त्रे आणि उपकरणे घेऊन ब्राइज नॉर्टन येथे पोहोचली आहे .

“अजेय योद्धा” हा लष्करी सराव भारतीय लष्कर आणि ब्रिटीश सैन्य यांच्यातील संरक्षण सहकार्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून उभय  राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी  देईल.

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920302) Visitor Counter : 316