इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आधार प्रमाणीकरण व्यवहारांची मार्चमध्ये 2.31 अब्जांवर झेप; आधार सक्षम ई-केवायसीत 16 टक्क्यांनी वाढ
मार्चमध्ये 21.47 दशलक्ष आधार यशस्वीरित्या अद्ययावत झाले
Posted On:
26 APR 2023 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
आधार धारकांनी मार्च 2023 मध्ये जवळपास 2.31 अब्ज प्रमाणीकरण व्यवहार केले आहेत. आधारचा वाढता वापर आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचेच हे द्योतक आहे.
मार्च महिन्यातील हे प्रमाण फेब्रुवारीच्या तुलनेत चांगले आहे. फेब्रुवारीत 2.26 अब्ज प्रमाणीकरण व्यवहार झाले होते. बहुसंख्य प्रमाणीकरण व्यवहार बायोमेट्रिक फिंगरप्रिंट वापरून केले जातात. त्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय आणि ओटीपी प्रमाणीकरण केले जाते.
आधार ई-केवायसी सेवा, पारदर्शक आणि चांगला ग्राहक अनुभव प्रदान करून तसेच व्यवसाय सुलभेत मदत करून बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवांसाठी उत्कृष्ट भूमिका बजावत आहे. मार्च 2023 मध्ये 311.8 दशलक्ष पेक्षा जास्त ई-केवायसी व्यवहार झाले. फेब्रुवारीच्या तुलनेत ते 16.3 टक्क्यांनी जास्त आहे.
ई-केवायसीचा अवलंब केल्याने वित्तीय संस्था, दूरसंचार सेवा प्रदाते आणि इतर यांसारख्या संस्थांच्या ग्राहक संपादन खर्चातही लक्षणीय घट झाली आहे. आधार ई-केवायसी व्यवहारांची एकत्रित संख्या मार्च 2023 अखेर 14.7 अब्जांच्या पुढे गेली आहे.
प्रौढ लोकसंख्येमध्ये आधार संपृक्तता सार्वत्रिक आहे. मार्च महिन्यात, रहिवाशांच्या विनंतीनुसार 21.47 दशलक्ष पेक्षा जास्त आधार अद्ययावत केले गेले होते, तर फेब्रुवारी 2023 मध्ये 16.8 दशलक्ष अद्ययावत करण्यात आले होते.
थेट निधी हस्तांतरणासाठी आधार सक्षम डीबीटी असो, शेवटच्या घटकापर्यंत बँकिंगसाठी आधार सक्षम व्यवहार प्रणाली (एईपीएस), प्रमाणीकरण किंवा ओळख पडताळणीसाठी ई-केवायसी असो, सर्व प्रकारच्या सुशासनाची डिजिटल पायाभूत सुविधा बळकट करण्यात आधार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे आणि रहिवाशांचे राहणीमान सुलभ करण्याचे ध्येय साकारण्यासाठी पाठबळ देत आहे.
उत्पन्न आलेखाच्या तळाशी असलेल्यांसाठी आर्थिक समावेशन सक्षम करण्याचे काम एइपीएस (AePS) करत आहे. मार्च 2023 मध्ये, AePS आणि मायक्रो एटीएमच्या नेटवर्कद्वारे शेवटच्या घटकांपर्यतचे 219.3 दशलक्ष बँकिंग व्यवहार शक्य झाले.
* * *
G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919933)
Visitor Counter : 161