संरक्षण मंत्रालय
कोप इंडिया सराव 2023 ची कलाईकुंडा येथील हवाई दलाच्या तळांवर सांगता
Posted On:
25 APR 2023 11:07AM by PIB Mumbai
भारतीय हवाई दल (IAF) आणि युनायटेड स्टेट्स एअर फोर्स (USAF) यांच्यात कलाईकुंडा, पानगढ आणि आग्रा इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळांवर गेले दोन आठवडे आयोजित करण्यात आलेल्या कोप इंडिया 2023 या द्विपक्षीय हवाई सरावाच्या सहाव्या आवृत्तीची 24 एप्रिल 2023 रोजी सांगता झाली. या सरावात भारतीय हवाई दलाच्या राफेल, तेजस, Su-30MKI, जग्वार, C-17 आणि C-130 सारख्या आघाडीच्या विमानांनी सहभाग घेतला. तर युनायटेड स्टेट्स एअर फोर्स ची F-15 'स्ट्राइक ईगल' फायटर, C-130, MC-130J, C-17 आणि B1B, स्ट्रॅटेजिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती. या सरावामध्ये जपानी हवाई सेल्फ डिफेन्स फोर्सचे कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून सहभागी झाले होते. या संयुक्त सरावामुळे सहभागी राष्ट्रांच्या हवाई दलांमध्ये परस्पर संवाद, परस्परांच्या सर्वोत्तम पद्धतींचे आदान-प्रदान आणि एकत्रित मोहिमेद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली.
या सरावादरम्यान, मैत्री आणि सौहार्द यांचे बंध अधिक दृढ व्हावेत, यादृष्टीने सांस्कृतिक आदानप्रदान विषयक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.
हा सराव दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणार्या दोन हवाई दलांमध्ये असलेले दृढ संबंध कायम राखून ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी खोलवर रुजलेल्या वचनबद्धतेला उजाळा देतो.
***
Jaidevi PS/BhaktiS/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919406)
Visitor Counter : 191