राष्ट्रपती कार्यालय

भारतीय नागरी लेखा सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 25 APR 2023 11:01AM by PIB Mumbai

 

भारतीय नागरी लेखा सेवेतील (2018-2021 तुकडीच्या) अधिकाऱ्यांनी आज (25 एप्रिल 2023) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की,ते देशाच्या आर्थिक प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावतील. तरुण नागरी सेवक या नात्याने त्यांनी सार्वजनिक प्रशासनात सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करणे आणि संविधानात दिलेल्या मूल्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. नियुक्ती कोणत्याही संस्थेत किंवा विभागात झाली तरी, आपल्या कामाच्या मूळ उद्देशाची जाणीव असणे आवश्यक आहे. जनतेचे कल्याण आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या उद्देशाने काम करायला हवे असे आवाहन राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्यांना केले. सरकारचे आर्थिक उत्तरदायित्व सुनिश्चित करणे आणि सार्वजनिक प्रशासनात पारदर्शकता आणणे यासाठी लेखा प्रक्रिया आणि लेखा अहवाल हे एक साधन  बनावे याची भारतीय नागरी लेखा सेवेने खातरजमा केल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. याद्वारे, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापनाची एक भक्कम प्रणाली देशातील न्याय्य आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी मदत करते असेही त्यांनी सांगितले.

ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशातील प्रशासनाचा साचाच बदलला आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. प्रशासन प्रणालींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर  झपाट्याने वाढतो आहे. डिजिटलीकरण आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे सार्वजनिक प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राष्ट्रपतींचे

भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा 

***

Sonal T/Vinayak /CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919401) Visitor Counter : 159