युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूरमशील इंफाळ येथे आयोजित राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या ‘चिंतन शिबिरात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, इंफाळच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते उद्‌घाटन


केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन आपापल्या राज्यात खेळांना प्रोत्साहन कसे देता येईल यावर मनमोकळी चर्चा करावी : अनुराग सिंह ठाकूर

Posted On: 24 APR 2023 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023

मणिपूरमधल्या इम्फाळ येथे आयोजित राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या ‘चिंतन शिबिराला ’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केले.

यावर्षी मणिपूरमध्ये ‘चिंतन शिबीर ’ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला  आणि ईशान्येतील अनेक खेळाडूंनी देशासाठी पदके जिंकून तिरंग्याची शान उंचावली असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी या प्रदेशातील सगोल कांगजाई, थांग-ता, युबी लक्पी, मुकना आणि हियांग तान्नबा यांसारख्या स्थानिक खेळांचा  उल्लेख केला आणि हे खेळ चित्तवेधक असल्याचे सांगितले. "ईशान्येकडची राज्ये आणि  मणिपूरने देशाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे", स्वदेशी खेळांबद्दल अधिक सांगताना  पंतप्रधानांनी कबड्डीसारख्याच  मणिपूरच्या ओ-लवाबी या खेळाचा उल्लेख केला. हियांग  तान्नबा केरळच्या नौवहन शर्यतीची आठवण करून देतो. मणिपूरचा पोलोशी असलेला ऐतिहासिक संबंध त्यांनी सांगितला.देशाच्या सांस्कृतिक विविधतेत ईशान्येकडची राज्ये नवे रंग भरतात  आणि देशाच्या क्रीडाविविधतेला नवीन आयाम प्रदान करतात. या चिंतन शिबिरातून  देशभरातील क्रीडा मंत्र्यांना नवे काही शिकायला  मिळेल विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

कोणत्याही चिंतन शिबिराची सुरुवात चिंतनातून होते, मननातून त्याला गती मिळते  आणि क्रियान्वयनातून पूर्णत्वास जाते   , असे सांगून पंतप्रधानांनी भविष्यातील उद्दिष्टांवर चर्चा करण्याची आणि मागील परिषदांचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित केली.  केवडिया येथे 2022 मध्ये झालेल्या मागील शिबिराचे पंतप्रधानांनी स्मरण करून यात  अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि  क्रीडा क्षेत्राच्या अधिक भरभराटीसाठी आवश्यक परिसंस्थेचा आराखडा  तयार करण्याबाबत सहमती झाल्याकडे लक्ष वेधले. क्रीडा क्षेत्रातील केंद्र आणि राज्यांमधील सहभाग वाढविण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि त्यातून साधलेल्या  प्रगतीवर प्रकाश टाकला.  हा आढावा धोरणे आणि कार्यक्रमांच्या स्तरावर मर्यादित  न ठेवता पायाभूत सुविधांचा विकास आणि मागील वर्षातील क्रीडा उपलब्धी यावर घेण्यात यावा,असे त्यांनी सांगितले.

मणिपूरमधील इंफाळ येथे आयोजित राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या ‘चिंतन शिबीराचा आज प्रारंभ झाला. या शिबीराला पंतप्रधाना नरेंद मोदी यांनी  संबोधित केले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, इंफाळच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते करण्यात आले.

इंफाळ येथील सिटी कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित हे छायाचित्र-प्रदर्शन हे चिंतन शिबिराचा भाग होते आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मिशन लाइफ, 9 साल सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विषयांवर होते.

अनुराग सिंह ठाकूर यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले की,इतर मोठ्या राज्यांच्या तुलनेत केवळ 36 लाख इतकी कमी लोकसंख्या असूनही मणिपूरने क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या योगदानाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विकसित करण्यासाठी मंजुरी दिली असून यासाठी  अंदाजे 900 कोटी रुपये खर्च केले जातील असे ते म्हणाले. त्यांनी मणिपूरच्या देशी खेळांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला. ते म्हणाले  की केंद्र सरकारने खेलो इंडियामध्ये अनेक देशी खेळांचा समावेश केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र यावे आणि आपापल्या राज्यात खेळांना प्रोत्साहन कसे देता येईल यावर मनमोकळी चर्चा करावी असे ते  म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी राज्यातल्या  खेळाडूंच्या कामगिरीचाही स्पष्ट उल्लेख केला आणि  देशाचा गौरव वाढवलेल्या मणिपुरी खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचेही कौतुक केले. देशाला अभिमानास्पद कामगिरी केलेल्या खेळाडूंची त्यांनी प्रशंसा केली आणि आशा व्यक्त केली की देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे खेळाडू घडवण्याचे प्रयत्न इतर राज्ये देखील  करतील.

आपल्या भाषणाचा समारोप करताना अनुराग ठाकूर यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहभागी क्रीडा मंत्र्यांना त्यांचे अनुभव सामायिक करण्याची  आणि त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये क्रीडा विषयक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची  सूचना केली.त्यांनी उपस्थितांना एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याचे आवाहन केले आणि क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज व्यक्त केली.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 32 खेलो इंडिया केंद्रे सुरू करण्यास मंजुरी  दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी उपस्थितांना  संबोधित करताना सांगितले की, सरकार देशातील क्रीडा प्रकारांच्या  संवर्धनासाठी नवीन योजना आखत आहे . ते म्हणाले की  हे शिबीर  आयोजित करण्यासाठी  आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळांच्या प्रचारासाठी एकत्र काम करण्यासाठी राज्यांना प्रेरणा देण्यासाठी  मणिपूर हे योग्य ठिकाण आहे.

चिंतन शिबिराच्या तांत्रिक सत्रात युवा पोर्टल, राष्ट्रीय युवा महोत्सवाची पुनर्रचना, खेलो इंडिया आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांचा आढावा, क्रीडा क्षेत्रातील अभिनव उपक्रम या विषयांवर सादरीकरण आणि संवादात्मक सत्रांमध्ये चर्चा झाली.

पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगढचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित, मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक , युवा व्यवहार सचिव मीता आर.लोचन आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी आणि मणिपूरचे मुख्य सचिव डॉ. राजेश कुमार चिंतन शिबिराच्या उद्घाटन सत्राला उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1919277) Visitor Counter : 209