वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
श्री राजेश कुमार सिंग यांनी उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
24 APR 2023 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
केरळ विभागातले 1989 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतले अधिकारी राजेश कुमार सिंग, यांनी उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या सचिवपदाचा भार आज श्री अनुराग जैन यांच्या कडून स्वीकारला. या आधी ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचीव होते आणि त्याआधी, ते मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.
श्री राजेश कुमार सिंग हे केरळ कॅडरचे 1989 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.त्यांनी केंद्र सरकारच्या दिल्ली विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणुनही काम पाहिले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सहसचिव, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव आणि भारतीय अन्न महामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी सारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. केरळ सरकारचे नगरविकास आणि वित्त सचिव म्हणून त्यांनी राज्य सरकारमध्येही महत्त्वाची पदं भूषवली आहेत.
G.Chippalkatti/S.Mohite/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919182)