कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे प्रसारण सामुदायिक स्वरूपात ऐकण्याची व्यवस्था करत, पंचायत राज संस्थांनी त्याला उत्सवी स्वरूप द्यावे-  केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे आवाहन

Posted On: 23 APR 2023 4:59PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील पंचायत राज व्यवस्थांच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन प्रतिसाद सत्र आयोजित केले होते.

येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातकार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे, हा भाग सर्वांनी ऐकावा. तसेच, अनेक लोकांना सामुदायिक रित्या हा कार्यक्रम ऐकता येईल, अशी व्यवस्था करुन, ह्या कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप देण्यासाठीही प्रयत्न केले जावेत, असे आवाहन त्यांनी केले. मन की बातहा सरकारच्या प्रमुखांचा कोणतेही राजकीय स्वरूप नसलेला कार्यक्रम असून, तो, देशाच्या विविध भागात होत असलेल्या विकासाला समर्पित तसेच, सरकारच्या कल्याणकारी योजना, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवणारा कार्यक्रम आहे.

तसेच, पहिल्यांदाच, शासनप्रमुखाने, सातत्याने, एकाही महिन्यात खंड पडू न देता, आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची, ही पहिलीच घटना असून हा एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे, ह्या कार्यक्रमाचा उत्सव होणे अगदी सयुक्तिक आहे, असे जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919001) Visitor Counter : 173