पंतप्रधान कार्यालय
बसव जयंतीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधानांनी जगद्गुरू बसवेश्वरांना नमन केले
Posted On:
23 APR 2023 9:41AM by PIB Mumbai
बसव जयंतीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगद्गुरू बसवेश्वरांना आदरांजली वाहिली आहे. मोदींनी जगद्गुरू बसवेश्वरांबद्दलचे त्यांचे विचार व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून सामायिक केले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“आजच्या बसव जयंतीच्या पवित्र प्रसंगी, मी जगद्गुरू बसवेश्वरांना नमन करतो, ज्यांचे विचार आणि आदर्श आपल्याला मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतात. त्यांनी आपल्या कार्यातून तळागाळातल्या समाजाला सशक्त करण्यावर आणि एक सशक्त आणि समृद्ध समाज निर्माण करण्यावर भर दिला.
नोव्हेंबर 2015 मध्ये लंडनमध्ये जगद्गुरू बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगीच्या खासदार शिवकुमार उदासी यांनी केलेल्या ट्विट संदेशांना मोदींनी प्रतिसाद दिला, पंतप्रधानांनी ट्विट केले;
“जगद्गुरू बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सदैव चालणार आहोत.
त्यांना आदरांजली वाहण्याच्या अनेक संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो.
***
U.Ujagare/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918892)
Visitor Counter : 225
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam