राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 21 APR 2023 9:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला  देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर, मी भारतात आणि  परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना , विशेषत: आपल्या मुस्लिम बंधू- भगिनींना हार्दिक  शुभेच्छा देते.

रमजानच्या  पवित्र महिना समाप्तीला साजरा केला जाणारा ईद  हा सण प्रेम, करुणा आणि स्नेह  भावनांचा प्रसार करतो.  ईद आपल्याला एकता आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देते.  हा सण समरसतेच्या भावनेने ओतप्रोत असून शांततापूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतो.

यानिमित्ताने समाजात बंधुभाव आणि सौहार्द वृद्धिंगत करण्याचा संकल्प करूया.

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1918656) आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi