जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जलशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा: शहरी भागात कॅच द रेन अभियान


जलसंपदा विभाग आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली प्रगती आढावा बैठक

पाणी टंचाई असलेल्या 150 जिल्ह्यांमध्ये शाश्‍वत जलस्त्रोत निर्माण करण्‍यावर ‘जल शक्ती अभियानाव्दारे करणार लक्ष केंद्रीत

Posted On: 21 APR 2023 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023

जलशक्ती मंत्रालयाचा  जलसंपदा विभाग  आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने   जलशक्ती अभियान : कॅच द रेन च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशातील शहरी भागात पूर्वतयारीच्या कामांच्या प्रगतीचा  एका बैठकीमध्‍ये संयुक्तपणे आढावा घेतला. या संयुक्‍त बैठकीच्या अध्‍यक्षस्थानी दोन्ही विभागांचे सचिव होते.   यावेळी ‘ जल शक्ती अभियान :कॅच द रेन’  (जेएसए : सीटीआर) 2023 मोहिमेची  प्रभावी अंमलबजावणी करण्‍याविषयी चर्चा झाली. बैठकीमध्‍ये  विविध महापालिकांचे  आयुक्त,  सामाजिक  संस्था आणि व्यक्तींनी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी शहरी भागातील प्रगती अहवालावर चर्चा करण्यात आली. भूजल पुनर्भरणासह शहरी भागातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विविध स्तरांवर घेतलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. जल जीवन मिशनमध्‍ये या वर्षी जेएसए: सीटीआर मोहिमेअंतर्गत पाणी टंचाई असलेल्या  150  जिल्ह्यांमध्ये शाश्‍वत स्त्रोत निर्माण करण्‍यावर  भर देणार आहे.

जलसंपदा विभागाचे सचिव, पंकज कुमार यांनी मागील मोहिमांमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि  यंदाच्या वर्षातही शहरी भागात पाणी बचतीसाठी असेच प्रयत्न करण्याची विनंती केली. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी पूर प्रतिबंध आणि शहरी भागात पाण्याची उपलब्धता वाढवण्याचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जेएसए: सीटीआर मोहिमेचे  महत्त्व आहे, यावर  भर दिला.

लातूर आणि वडोदरा पालिका आयुक्तांनी जिल्ह्यातल्या जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या उत्तम पद्धती आणि शहरांमधल्या स्मार्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत सादरीकरण केले.

 

 

 

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1918642) Visitor Counter : 202


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu