वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

संधीच्या भांडारामुळे भारत जगातील सर्वाधिक विश्वासार्ह व्यापार आणि गुंतवणूक स्थानांपैकी एक बनला आहे- रोममध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या  व्यापार संवाद सत्रात पीयूष गोयल यांचे प्रतिपादन


नव्या क्षमतांचा विचार करता भारत- इटली भागीदारीमध्ये मोठी लक्ष्ये निर्धारित केली पाहिजेत- पीयूष गोयल

Posted On: 14 APR 2023 11:20AM by PIB Mumbai

 

संधीच्या भांडारामुळे भारत जगातील सर्वाधिक विश्वासार्ह व्यापार आणि गुंतवणूक स्थानांपैकी एक बनला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. ते काल रोममध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या  व्यापार संवाद सत्रामध्ये बोलत होते. युरोपीय संघ आणि ईएफटीए यांच्यासोबत व्यापारविषयक वाटाघाटी सुरू असलेला जागतिक संबंध असलेला भारत हा एक व्यापारासाठी खुला देश आहे, असे गोयल म्हणाले.

भारत आणि इटली यांच्या भागीदारीमध्ये नव्याने निर्माण झालेल्या क्षमतेच्या विशेषतः  अलीकडच्या काळात उंचावलेल्या सामरिक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर भारत-इटली भागीदारीमध्ये अतिशय मोठी लक्ष्ये निर्धारित केली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले गेल्या दोन वर्षात भारताच्या एकंदर निर्यातीमध्ये 55 टक्के वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. भारतामध्ये सुमारे 700 इटालियन कंपन्या कार्यरत आहेत आणि भारतामध्ये सध्याचा काळ हा सर्वाधिक संधी असलेला काळ आहे, असे त्यांनी नमूद केले. पूर्वलक्षी प्रभावाने लागू बदलांसह भारत एक अतिशय मजबूत प्रगतीशील धोरणाचा आराखडा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री ऍन्टोनियो तजानी देखील संवाद सत्रात सहभागी झाले  आणि त्यांनी उद्योगातील अग्रणींना संबोधित केले. एमएसएमई आणि उद्योगांना पाठबळ देऊन दोन्ही देशात पुढच्या पिढीच्या काळाला अनुरूप ठरतील अशा प्रकारच्या उत्तम व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज तजानी यांनी व्यक्त केली. इटलीत रोममध्ये, तेथील भारतीय दुतावासाने भारतीय उद्योग महासंघ(सीआयआय) आणि कॉन्फीइंडस्ट्रियाच्या सहकार्याने सीईओ व्यापार संवाद सत्राचे आयोजन केले होते.या सत्रामध्ये भारतीय आणि इटालियन कंपन्याचे 70 पेक्षा जास्त सीईओ सहभागी झाले होते.

गोयल यांच्या या इटली दौऱ्यामध्ये एसओएल, एसपीए, पियाजियो, सिब्जो, नायरा एनर्जी आणि एनेल ग्रीन पॉवर यांसारख्या प्रमुख इटालियन कंपन्यांच्या सीईओंसोबत त्यांची अतिशय फलदायी चर्चा झाली आहे. भारतामध्ये गुंतवणुकीसाठी असलेले पोषक वातावरण, धोरणांमधील सुधारणा आणि गुंतवणुकीसाठी आणि विस्तारासाठी असलेली क्षमता याची सविस्तर माहिती गोयल यांनी या सीईओंना दिली. भारतीय बाजारपेठेची गरज भागवण्याबरोबरच निर्यातीसाठी देखील भारतातील कामकाजाचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याची माहिती या सीईओंनी केंद्रीय मंत्र्यांना दिली.यामुळे केवळ उत्पादनाचा विस्तार आणि रोजगारसंधींमध्येच वाढ होणार नसून भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्येही वाढ होईल.

गोयल यांनी इटलीमध्ये पोलाद भंगार आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष दानिएली सी स्पा, आंद्रिया डायास्पारो यांची भेट घेतली. अनेक संधी उपलब्ध असलेली भारतीय बाजारपेठ मोठी आहे आणि भारताला हरित पोलाद उत्पादनात हळूहळू प्रवेश करायचा आहे ज्यामध्ये विस्ताराला मोठ्या प्रमाणावर वाव असेल, अशी माहिती गोयल यांनी त्यांना दिली.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1916692) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu