सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशभरातून अभिवादन
Posted On:
14 APR 2023 1:40PM by PIB Mumbai
भारतरत्न बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आज देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी संसद भवनातल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांना पुष्पांजली अर्पण केली.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार आणि इतर केंद्रीय मंत्री, मान्यवर नेते आदींनी देखील अभिवादन केले.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1916580)