युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाडाद्वारे “ प्रामाणिक खेळांसाठी मार्ग निर्मिती : पोषक पूरक आहाराच्या वापराशी संबंधित जोखमींवर भागधारकांशी संवाद” या राष्ट्रीय परिषदेचे आज नवी दिल्लीत केले आयोजन


एफएसएसएआय, एनआयपीईआर हैदराबाद आणि एनएफएसयू सोबत नुकतेच झालेले सामंजस्य करार देशात पोषक पूरक पदार्थांची चाचणी क्षमता निर्माण करतील आणि या क्षेत्रातील संशोधन तसेच क्षमता वाढीस प्रोत्साहन देतील : अनुराग ठाकूर

Posted On: 13 APR 2023 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

 

नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ने आज नवी दिल्ली येथे, क्रीडा परिसंस्थेमधील भागधारकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रामाणिक खेळांसाठी मार्ग निर्मिती : पोषक पूरक आहाराच्या(सप्लीमेंट्स) वापराशी संबंधित जोखमीवर भागधारकांशी संवाद या विषयावर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय सचिव (क्रीडा) सुजाता चतुर्वेदी, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमला वर्धन राव, वाडाच्या (WADA) एशिया / ओशनिया प्रादेशिक कार्यालयाचे संचालक काजुहिरो हयाशी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, नागाच्या महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितू सैन हे मान्यवर उद्घाटन सत्रात सहभागी झाले होते.

पोषक पूरक आहारांच्या वापराशी संबंधित जोखमींबद्दल जागरूकता वाढवणे ही सर्व भागधारकांची सामूहिक जबाबदारी आहे, असे अनुराग सिंह ठाकूर यांनी आपल्या मुख्य भाषणात सांगितले. तथापि, अंततः क्रीडापटू जे काही सेवन करतात आणि त्यामुळे जर कोणत्याही अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तेच जबाबदार असतात असेही ते म्हणाले, "अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, एनआयपीईआर हैदराबाद आणि एनएफएसयू सोबत नुकतेच केलेले सामंजस्य करार देशात पोषक पूरक पदार्थांची चाचणी क्षमता निर्माण करतील आणि या क्षेत्रातील संशोधन तसेच क्षमता वाढीस प्रोत्साहन देतील." असेही त्यांनी सांगितले.

अनुराग ठाकूर यांनी परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान ‘नो युवर मेडिसिन’ हे वेब आणि मोबाईल ॲप्लिकेशनही लॉन्च केले. हे ॲप्लिकेशन औषधांमध्ये कोणतेही प्रतिबंधित पदार्थ आहे का ते तपासण्यासाठी आणि औषधांच्या वापराबद्दल माहितीपूर्ण निवड करण्यासाठी क्रीडा परिसंस्थेला सक्षम करेल. हे ॲप्लिकेशन हिंदी आणि इंग्रजीमध्ये अँड्रॉइड आणि मोबाइल ॲप आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या ॲपद्वारे छायाचित्र किंवा लिखीत मजकूर या दोन्ही पर्यायांचा वापर करून शोध घेता येतो. शिवाय औषधाचे नाव किंवा त्यातील घटक या पर्यायांद्वारे देखील शोध घेता येतो. हे ॲप वापरकर्ता - अनुकूल वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. हे प्लिकेशन NADA द्वारे विकसित केले गेले आहे. या ॲपद्वारे आपल्या क्रीडापटू आणि क्रीडा परिसंस्थेला असे साधन प्रदान करणाऱ्या जगातील काही निवडक राष्ट्रांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे.

 

 

 

 

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916364) Visitor Counter : 173