वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पियूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांची घेतली भेट


भारत-इटली व्यापार व आर्थिक भागीदारीवर उभय मंत्र्यांनी केला विचार विनिमय

धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर द्विपक्षीय संबंध दृढ झाल्याबद्दल मंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 13 APR 2023 12:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल इटलीचे उपपंतप्रधान तसेच इटली सरकारच्या परराष्ट्र कार्यालयातील परराष्ट्र व्यवहार व आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांची भेट घेतली.  सोबतच

द्विपक्षीय व्यापार व आर्थिक संबंधांच्या संपूर्ण पैलूंचा आढावा देखील घेतला. गोयल काल दोन दिवसीय इटली दौऱ्यासाठी रोम मध्ये दाखल झाले.

विविध क्षेत्रांतील वृद्धीसाठी भारत-इटली व्यापार व आर्थिक भागीदारी कशा प्रकारे उपयोगात आणता येईल, यावर मंत्र्यांनी विचार विनिमय केला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यानंतर, धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर द्विपक्षीय संबंध

दृढ झाल्याबद्दल दोन्ही मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. अवकाश, तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी इत्यादी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचा पाठपुरावा करण्यासाठी या धोरणात्मक क्षेत्रात संयुक्त कार्यगट स्थापन करण्याची सूचना ताजानी यांनी केली.

भारत व इटली यांच्यातील द्विपक्षीय व्यापारातील मोठ्या वाढीबद्दल उभय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले, हा व्यापार 2022 मध्ये 16 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे; हा व्यापार आणखी वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. गोयल यांनी ताजानी यांना भारत-युरोपियन

युनियन मुक्त व्यापार करार वाटाघाटीतील प्रगतीची माहिती दिली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी खुला, संतुलित व न्याय्य मुक्त व्यापार करार साध्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले; तसेच हा करार लवकरच पूर्णत्वाला जाईल, अशी आशा व्यक्त केली. सप्टेंबर 2023च्या अखेरच्या

आठवड्यात रोम येथे आर्थिक सहकार्यावरील संयुक्त आयोगाचे (जेईईसी ) पुढील सत्र आयोजित करण्यासही सहमती दर्शवली.

दोन्ही देशांच्या संसदेमधील संसदीय मैत्री गट मुत्सद्देगिरी बळकट करणे व सायबर संवादासाठी वाव शोधण्याचे ताजनी यांनी सुचवले. गोयल यांनी ताजानी यांना भारताच्या जी -20 अध्यक्षतेखालील प्राधान्यक्रमांबद्दल माहिती दिली. ऑगस्ट 2023 मध्ये भारतात होणाऱ्या जी-20

व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी त्यांना आमंत्रित केले.  भारताचा  जी-20 अध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन ताजानी यांनी दिले.

हवामान बदलाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी शाश्वतता प्राप्त करण्यासाठी स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर गोयल यांनी भर दिला. विकसित देश हवामान बदलाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी   विकसनशील देशांना किफायतशीर हवामान

वित्तपुरवठा व तंत्रज्ञान उपलब्ध करून देतात, असे त्यांनी नमूद केले.

इटली सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातील फर्नेसिना कला दालनाला  गोयल यांनी भेट दिली यावेळी त्यांना ताजानी यांनी मार्गदर्शन केले.

 


S.Pophale/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916134) Visitor Counter : 174