आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांच्या फायद्यासाठी,सीजीएचएसच्या पॅकेज दरात केली सुधारणा
सीजीएचएस अंतर्गत संदर्भ प्रक्रियेचे सुलभीकरण, लाभार्थ्यांना आता व्हिडिओ कॉलद्वारे संदर्भ मिळवता येणार
Posted On:
12 APR 2023 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व सीजीएचएस (CGHS), अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सीजीएचएस पॅकेज दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी सीजीएचएस अंतर्गत संदर्भ प्रक्रियाही सुलभ केली आहे.
भागधारकांच्या मागण्यांची योग्य तपासणी केल्यावर, आणि आरोग्य सेवेच्या विविध घटकांच्या खर्चात झालेली वाढ विचारात घेऊन, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरुवातीला, सल्लामसलत शुल्क, आयसीयू शुल्क आणि खोलीचे भाडे यांच्या सीजीएचएस पॅकेज दरांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला असून, तो पुढील प्रमाणे आहे:
Item
|
Existing
|
Revised
|
Consultation Fee –
OPD Consultation
IPD Consultation
|
Rs 150
Rs.300
|
Rs 350
Rs 350
|
ICU charges –
includes Rs 750 for non-NABH hospitals and Rs 862* for NABH hospitals includes – monitoring, RMO charges, nursing care and in addition Room rent is as per ward entitlement of beneficiary –general ward / semi-private ward / private ward is permitted.
*15% more for NABH accredited
|
Rs 862 for NABH + Room rent as per ward entitlement
|
Rs 5,400/- (Rs 862 + Rs 4,500/- for Private ward = 5,362- rounded to Rs 5,400) including accommodation for all ward entitlements.
|
Room Rent –
General ward
Semi-Private ward
Private ward
|
Rs 1000/-
Rs 2,000/-
Rs.3,000/-
|
Rs 1,500/-
Rs. 3,000/-
Rs.4,500/-
|
सुधारित सीजीएचएस दर:
सीजीएचएस अंतर्गत संदर्भ प्रक्रिया देखील सुलभ करण्यात आली आहे.यापूर्वी सीजीएचएस लाभार्थ्याला सीजीएचएस आरोग्य केंद्राला स्वतः भेट द्यावी लागत होती, आणि रुग्णालयात रेफरल (संदर्भ) द्यावा लागत होता. पण आता, सीजीएचएस लाभार्थी स्वतः जाण्यासाठी असमर्थ असेल,तर तो आपल्या वतीने एखाद्या व्यक्तीला आपल्या कागदपत्रांसह आरोग्य केंद्रात पाठवू शकतो. रुग्णाची कागदपत्रे तपासल्यावर, वैद्यकीय अधिकारी लाभार्थीला रुग्णालयात जाण्यासाठी संदर्भ देऊ शकेल.याशिवाय सीजीएचएस लाभार्थी व्हिडिओ कॉलद्वारे देखील रेफरल (संदर्भ)मिळवू शकेल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916039)
Visitor Counter : 862