आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ताजी माहिती
कोविड -19 च्या दोन दिवसीय राष्ट्रव्यापी ‘मॉक ड्रील’चा झाला समारोप
724 जिल्ह्यांमध्ये 33,685 आरोग्य सुविधांच्या स्थानी केली कवायत
प्रविष्टि तिथि:
11 APR 2023 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
देशामध्ये कोविड संक्रमणाच्या घटना वाढत असल्यामुळे भारताच्या कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात मोठ्या प्रमाणावर देशव्यापी ‘मॉक ड्रील’ करण्यात आले. यामध्ये 724 जिल्ह्यांतील 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले दोन दिवसीय ‘कोविड-19 मॉक ड्रील’.
काही राज्यांमध्ये कोविड-19 रूग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 28 मार्च 2023 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 10 आणि 11 एप्रिल 2023 रोजी कोविड समर्पित आरोग्य सुविधांसह इतर सर्व आरोग्य सुविधांवर मॉक ड्रील आयोजित करण्यासाठी पत्र लिहिले होते. उपकरणे, कार्यपद्धती आणि मनुष्यबळाच्या दृष्टीने त्यांच्या तयारीच्या पातळीचे मूल्यांकन करण्याची सूचना देण्यात आली होती.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 7 एप्रिल 2023 रोजी, सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सर्व आरोग्य सुविधांचे मॉक ड्रील करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांसह तयारीचा आढावा घेण्याचे सुचविले होते.
त्यानंतर दि.10 आणि 11 एप्रिल 2023 रोजी 28,050 सरकारी सुविधांसह एकूण 33,685 आरोग्य सुविधांमध्ये मॉक ड्रील करण्यात आले. यामध्ये 5,635 खाजगी आरोग्य सुविधांचाही समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालये, सरकारी रुग्णालये, जिल्हा/नागरी रुग्णालये, सीएचसी, एचडब्ल्यूसी आणि पीएचसी, खाजगी आरोग्य सुविधा, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, खाजगी रुग्णालये आणि इतर खाजगी आरोग्य केंद्रांचा समावेश होतो.
ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, विलगीकरणासाठी राखून ठेवलेल्या खाटा, व्हेंटिलेटर, पीएसए प्लांट्स, द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर तसेच औषधे आणि पीपीई संचासह गंभीर आजारी रूग्णांसाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि संसाधनांचे मूल्यांकन करण्यात आले. या सरावाच्या वेळी वैद्यकीय कर्मचार्यांना केवळ कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठीच नियुक्त करण्यात आले.
देशव्यापी मॉक ड्रिलच्या तयारीसाठी, राज्य आणि जिल्हा दक्षता पथकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचेही 4, 5 आणि 6 एप्रिल 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणांमध्ये राज्य आणि जिल्हा दक्षता पथक, माहिती (डेटा) अद्ययावत ठेवण्याच्या कामावरही लक्ष केंद्रित केले होते. कोविड-19 इंडिया पोर्टलवर डेटा अद्ययावत करण्यात कोणतीही अडचण येत असेल तर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी काय करावे, उपलब्ध असलेल्या सुविधांचे प्रकार आणि हेल्पलाइनचे तपशील, पूर्ण करण्यासाठी काय करायचे, हे सांगण्यात आले. या पूर्वतयारी प्रशिक्षणात एकूण 1544 जण सहभागी झाले होते.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915730)
आगंतुक पटल : 168