रेल्वे मंत्रालय
उन्हाळ्यामध्ये प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने अतिरिक्त 4010 विशेष फेऱ्या केल्या मंजूर
एकूण 217 विशेष गाड्या 4010 फेऱ्या करणार
देशभरातील प्रमुख स्थळांना लोह मार्गांनी जोडण्यासाठी विशेष गाड्या
Posted On:
11 APR 2023 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
उन्हाळ्याच्या हंगामात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे यावर्षी 217 विशेष गाड्यांच्या 4010 फेऱ्या चालवणार आहे.देशभरातील प्रमुख स्थळांना लोह मार्गांनी जोडण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
उन्हाळी हंगाम विशेष गाड्या 10 एप्रिल, 2023 पासून धावत आहेत. या गाड्यांविषयी माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.
प्रवासाच्या काळामध्ये रेल्वेत कोणतेही गैरप्रकार केले जावू नयेत. यामध्ये आसनांचे कोपरे खराब करणे, विनाकारण साखळी ओढून प्रवासामध्ये बाधा आणणे, या गोष्टी घडू नयेत, यासाठी सर्वत्र कडक नजर ठेवण्यात येत आहे.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915670)
Visitor Counter : 217