वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने 31 वस्तूंसाठी 2 गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केल्याची घोषणा केली

Posted On: 11 APR 2023 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023

 

तांत्रिक अधिनियमांच्या अधिसूचनेच्या योग्य प्रक्रियेनंतर वस्त्रोद्योग मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात 19 जिओ टेक्सटाइल आणि 12 प्रोटेक्टिव्ह टेक्सटाईल्सचा समावेश असलेल्या 31 वस्तूंसाठी 2 गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी  केल्याची घोषणा केली.

हे गुणवत्ता नियंत्रण आदेश तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी भारतातील पहिले तांत्रिक अधिनियम  म्हणून ओळखले जातील अशी माहिती संयुक्त सचिव राजीव सक्सेना यांनी आज  पत्रकार परिषदेत दिली.

पर्यावरण, मानवी आरोग्य आणि प्राणी व  वनस्पती जीवन आणि आरोग्य यांच्या संरक्षणासाठी जिओ टेक्सटाइल्स आणि प्रोटेक्टिव्ह टेक्सटाइल्सचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवणे हे  सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे. जिओ-टेक्सटाइलचा वापर पायाभूत सुविधा प्रकल्प आणि पर्यावरणीय अनुप्रयोगांसाठी केला जातो तर प्रोटेक्टिव्ह टेक्सटाईल्सचा वापर धोकादायक आणि प्रतिकूल कामकाजाच्या परिस्थितीपासून मानवी जीवांचे रक्षण करण्यासाठी केला जातो. गुणवत्ता नियंत्रण आदेश  वापरकर्ते आणि ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य प्रदान करण्याचा प्रयत्न करतील आणि परिणामी  भारतीय उत्पादनांचा दर्जा वाढून त्यांची तुलना  जागतिक मानकांशी होऊ शकेल.

31 वस्तूंपैकी 19 वस्तू जिओ टेक्सटाइल श्रेणीतील आहेत. तर उर्वरित 12 वस्तू प्रोटेक्टिव्ह टेक्सटाइल श्रेणीतील आहेत.

जिओ टेक्सटाइल्स आणि प्रोटेक्टिव्ह टेक्सटाइल्स हे दोन्ही  गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून  180 दिवसांनी त्वरित लागू होतील. या गुणवत्ता नियंत्रण आदेशात  नमूद  केलेली अनुरूपता मूल्यमापन आवश्यकता देशांतर्गत उत्पादक तसेच भारतात  उत्पादने निर्यात करू इच्छिणाऱ्या परदेशी उत्पादकांनाही लागू आहेत.

वस्त्रोद्योग मंत्रालय दुसऱ्या टप्प्यात 28 वस्तूंसाठी आणखी 2 गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्याची योजना आखत आहे, ज्यात कृषी वस्त्र श्रेणीतील 22 वस्तू आणि वैद्यकीय वस्त्र श्रेणीतील 6 वस्तूंचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्यासाठी आणखी 30 हून अधिक तांत्रिक वस्त्रांचा  विचार केला जाऊ शकतो.

गुणवत्ता नियंत्रण आदेश तांत्रिक कापडाचा दर्जा आणि गुणवत्ता सुनिश्चित करतील आणि स्पर्धात्मक किंमतींत  दर्जेदार उत्पादनांची निर्मिती  करण्यासाठी भारतात या उद्योगाच्या वाढीला प्रोत्साहन देतील.

 

  

 

 

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1915582) Visitor Counter : 238