कृषी मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला नवी ओळख प्रदान केली - तोमर


लघुउद्योग भारतीने आयोजित केलेल्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे केंद्रीय मंत्री तोमर यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 09 APR 2023 8:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज ग्वाल्हेरमध्ये लघु उद्योग भारतीने आयोजित केलेल्या स्टार्टअप कॉन्क्लेव्ह-2023 चे उद्घाटन केले. आज आपण ब्रिटीशकालीन गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलो आहोत, आज संपूर्ण परिस्थिती बदलली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, असे तोमर याप्रसंगी बोलताना म्हणाले.

एक काळ असा होता की आपल्या देशात प्रतिभा होती पण आपल्याला ती ओळखता येत नव्हती, असे तोमर म्हणाले. या प्रतिभावंतांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. त्यामुळेच या प्रतिभावंतांची देशात निराशा होत होती आणि ते परदेशात जात होते, पण आज तशी परिस्थिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परिस्थिती समजून घेऊन देशात सकारात्मक वातावरण निर्माण केले, त्यामुळे केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग बदलले आहे, असे तोमर यांनी सांगितले.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915159) Visitor Counter : 149