आयुष मंत्रालय
एकात्मिक समग्र आरोग्यासंदर्भात सी-20 च्या कार्यकारी मंडळासाठी एआयआयए ने केले एका वॉकथ्रूचे आयोजन
आयुर्वेदातील संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्यासाठी एआयआयए आणि अमृत विश्व विद्यापीठम् यांच्यात झाला सामंजस्य करार
Posted On:
09 APR 2023 4:52PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) 8 एप्रिल 2023 रोजी “एकात्मिक समग्र आरोग्यासंदर्भात सी-20 च्या कार्यकारी मंडळासाठी वॉकथ्रूचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 400 हून अधिक प्रतिनिधींचा मोठा गट सहभागी झाला होता. आरोग्य क्षेत्रात एकात्मिक दृष्टिकोनाची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जाऊ शकते हे संस्थेने या गटाला दाखवले.
सी-20 हा जी-20 मंचाच्या आठ अधिकृत प्रतिबद्धता गटांपैकी एक आहे. सी-20 भारत 2023 हा जी-20 च्या अधिकृत प्रतिबद्धता गटांपैकी एक असून हा गट लोकांच्या आशा-आकांक्षांचा आवाज जी-20 मधील जागतिक नेत्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जगभरातील नागरी संस्था संघटनांना (CSO) व्यासपीठ प्रदान करतो.
एआयआयए ला भेट देणाऱ्या या प्रतिनिधी मंडळात संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्यक सरचिटणीस तसेच संयुक्त राष्ट्र महिला गटाच्या उप कार्यकारी संचालक (संसाधन व्यवस्थापन, शाश्वतता आणि भागीदारी आणि लैंगिक समानता क्षेत्रात काम करणारा संयुक्त राष्ट्र विभाग, महिला सक्षमीकरणासाठी) डॉ. अनिता भाटिया; माता अमृतानंदमयी मठाचे उपाध्यक्ष आणि अमृत विश्व विद्यापीठम (अमृत विद्यापीठ) चे अध्यक्ष स्वामी अमृतस्वरूपानंद पुरई; आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. मनोज नेसारी; अर्जेंटिनाचे माजी आरोग्य मंत्री तसेच सेंटर फॉर इम्प्लीमेंटेशन अँड इनोव्हेशन इन हेल्थ पॉलिसीचे संचालक डॉ. ॲडॉल्फो रुबिनस्टाईन यांच्यासह इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल इफेक्टिवनेस अँड हेल्थ पॉलिसी (IECS) चे संस्थापक आणि महासंचालक आणि इतर प्रतिनिधींचा समावेश होता. संस्थेने एक वॉकथ्रू आयोजित केला होता. या उपक्रमात प्रतिनिधींना रुग्णालय भेटीसाठी नेण्यात आले आणि मानवतेच्या कल्याणासाठी आरोग्य सेवेतील एकात्मिक दृष्टीकोन प्रभावीपणे कसा लागू केला जाऊ शकतो यावर प्रकाश टाकण्यात आला.
एआयआयए ने आयुर्वेदातील संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य आणि सहयोगासाठी अमृता विश्व विद्यापीठमसोबत सामंजस्य करारही केला आहे. अमृता विश्व विद्यापीठ हे एक बहु-कॅम्पस, बहु-अनुशासनात्मक संशोधन अकादमी विद्यापीठ आहे ज्याला यापुढे अमृता म्हणून संबोधले जाणार आहे. या सामंजस्य करारावर आयुष मंत्रालयाच्या एआयआयए च्या संचालक प्रा. तनुजा नेसारी आणि अमृता विश्व विद्यापीठमच्या कोची कॅम्पसमधील वैद्यकीय विज्ञानाचे प्रोव्होस्ट प्रेम कुमार वासुदेवन नायर यांनी स्वाक्षरी केली.
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915110)
Visitor Counter : 205