वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-फ्रान्स यांच्यातील 25 वर्षांच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या निमित्ताने येत्या 11 एप्रिल 2023 रोजी भारत-फ्रान्स उद्योग परीषद आयोजित होणार आहे.
Posted On:
09 APR 2023 1:43PM by PIB Mumbai
येत्या 11 एप्रिल 2023 रोजी भारत-फ्रान्स मैत्रीची 25 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने एक उद्योग परीषद आयोजित करण्यात आली असून, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री, श्री पीयूष गोयल आणि फ्रान्स सरकारचे, परदेश व्यापार, गुंतवणूक (आकर्षक) आणि परदेशातील फ्रेंच नागरिकांचे प्रतिनिधी, श्री ऑलिव्हियर बेख्त, हे दोघे या भारत फ्रान्स उद्योग परीषदेचे सह-अध्यक्ष असतील.
पर्यावरणाचे भविष्य, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशांमधील सहकार्य या विषयांवर या शिखर परिषदेत लक्ष केंद्रित केले जाईल. यावेळी गोयल विविध क्षेत्रातील फ्रेंच व्यावसायिक नेत्यांना भेटणार असून प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गोयल दिनांक 11 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत फ्रान्स आणि इटलीला अधिकृत भेट देणार आहेत. त्यांच्या सोबत भारतातील प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ असेल.
फ्रान्सचे मंत्री श्री.ऑलिव्हियर बेख्त यांच्यासमवेत, गोयल भारताचा सांस्कृतिक वारसा आणि संगणकीय तंत्रज्ञान शक्तीचे ( सॉफ्ट पॉवर) यांचे दर्शन देणार्या कार्यक्रमात सहभागी होतील ज्यामध्ये फ्रान्स सरकार, फ्रान्स स्थित भारतीय व्यावसायिक वर्ग आणि फ्रेंच व्यापारी समुदायातील 600हून अधिक मान्यवरांचा सहभाग अपेक्षित आहे. यावेळी मंत्रीमहोदय पॅरिसमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही संवाद साधणार आहेत.
पियुष गोयल यानंतर, इटली येथील रोमला जातील, जेथे ते इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री, एच.ई. अँटोनियो ताजानी, यांची ते भेट घेतील, त्यानंतर सरकार आणि उद्योगातील मान्यवरांसह, दोन्ही देशांचे संबंध द्विगुणित करणाऱ्या सहभोजनाचा आस्वाद घेतील. द्विपक्षीय बैठकांसाठी ते प्रमुख इटालियन कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटतील, त्यानंतर प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी परस्पर संवाद साधत एका इंटरएक्टिव्ह उद्योग बैठकीला उपस्थित राहतील, ज्यात एकूण 35 सीईओ सहभागी होण्याची शक्यता आहे. यावेळी इटलीचे, उद्योग (एंटरप्रायझेस) मंत्री श्री.एच.ई. ॲडॉल्फो उर्सो, हे देखील भारतातील प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
या भेटीमुळे युरोपीय क्षेत्रातील भारताच्या प्रमुख व्यावसायिक भागीदारांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
***
S.Pophale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915069)
Visitor Counter : 242