विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएम-आयसीपीएस अभियानामुळे तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर आणि व्यावसायिकरणाला गती मिळून 'टीआयएच'च्या माध्यमातून ते देशभर पोहचू शकेल: तज्ज्ञांचे मत

Posted On: 08 APR 2023 12:12AM by PIB Mumbai

 

आंतरशाखीय सायबर भौतिक प्रणाली विषयक राष्ट्रीय अभियान (NM-ICPS), नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने, अधिक बळकट कसे करता येईल, यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये चर्चा झाली. तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर आणि व्यावसायिकरणाला अधिक गती देत, त्याला देशाच्या आर्थिक विकासाचे मुख्य प्रणेते कसे बनवता येईल, यावर 'सायबर- प्रत्यक्ष प्रणालीमधील तंत्रज्ञान नवोन्मेष' या विषयावरील कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.

MD4A4510

आरोग्य आणि औषधशास्त्र, स्मार्ट वाहतूक व्यवस्था, तसेच स्मार्ट उत्पादन व्यवस्था अशा क्षेत्रात, सायबर भौतिक प्रणाली (CPS) महत्वाची भूमिका पार पाडू शकते. मात्र, ही भूमिका बजवण्यासाठी सीपीएसच्या पारंपरिक मार्गात बदल करत, त्यात कृत्रिम बुद्धीमत्ता, आयओटी, रोबोटिक्स यांसारख्या नव्या तंत्रज्ञनांचा अवलंब करायला हवा. हे अत्याधुनिक तंत्रज्ञानच सीपीसीला भविष्यात नवी गती देणारे ठरेल असे मत, नीती आयोगाचे सदस्य (विज्ञान आणि तंत्रज्ञान) डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी 'टिप्स'च्या दुसऱ्या कार्यशाळेत व्यक्त केले.

2018मध्ये सुरू करण्यात आलेल्या एनएम-आयसीपीएस मिशनद्वारे तयार केलेल्या विंडो लक्षात घेऊनजागतिक स्तरावर वाढणाऱ्या सीपीएस मार्केटमध्ये भारत सहभागी होऊ शकेल, यासाठी आधीच तयार करण्यात आलेल्या मूल्यवर्धनाचे प्रमाण आता निश्चित केले जावे, यावरही त्यांनी भर दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने डिसेंबर 2018मध्ये आंतरशाखीय सायबर भौतिक प्रणाली विषयक राष्ट्रीय अभियानाला मंजूरी दिली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या पाच वर्षात, 3660 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजूरी देण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने, या अभियानाची अंमलबजावणी करायची आहे.

अभियानाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून 25 'तंत्रज्ञान नवोन्मेष हब' (TIHs) म्हणजेच केंद्रे देशभरात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुरु करण्यात आली आहेत. या 'टीआयसीएच'मध्ये, तंत्रज्ञान विकास आणि त्याचा प्रत्यक्ष वापर, मनुष्यबळ आणि कौशल्य विकास, स्वयं उद्यमशीलता आणि स्टार्ट अप विकास तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यातून संशोधन यावर भर देण्यात आला आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि टीआयएचचे विहित उपक्रम राबवण्यासाठी, मिशन कार्यालय आणि तज्ञ समिती सदस्य आणि टीआयएचचे अधिकारी यांच्यात थेट चर्चा होत असते.

बेंगळुरूच्या एक्सिलॉर व्हेंचर्सचे अध्यक्ष तसेच NM-ICPSच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. क्रिस गोपालकृष्णन यांनी संशोधन आणि तंत्रज्ञान भाषांतरात वाढ आणि उद्योग तसेच इतर स्त्रोतांकडून वाढीव निधी वापरण्यासाठी प्रणालीमध्ये क्षमता विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. आयआयटी दिल्ली इथे 6-8 एप्रिल, 2023 दरम्यान झालेल्या सायबर भौतिक प्रणाली (TIPS) विषयक तंत्रज्ञान नवोन्मेष या विषयावरील दुसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेत त्यांनी हे मत व्यक्त केले.

त्यांनी विविध प्रकारच्या सहकार्यांची गरज अधोरेखित केली ज्याद्वारे तंत्रज्ञान इनोव्हेशन हब उच्च टीआरएल स्तरांवर तंत्रज्ञान वाढविण्यात मदत करू शकतात.

आयआयटी मद्रासचे प्रो. अशोक झुनझुनवाला यांनी, नवकल्पना आणि उद्योजकता या क्षेत्रातील नवोन्मेषकांना यशस्वी करण्यासाठी हे केंद्र कोणती पावले उचलू शकतात यावर सविस्तर माहिती दिली. तर आयआयटी दिल्लीचे माजी संचालक, प्रो. व्ही रामगोपाल राव यांनी हे केंद्र शैक्षणिक संशोधन आणि विकासाला, उत्पादनाशी कसे जोडू शकते यावर लक्ष केंद्रित केले.

'एसईआरबी'चे सचिव तसेच विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अखिलेश गुप्ता यांनी हे हब नियामक मंडळ आणि वैज्ञानिक सल्लागार समितीसोबत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर व्यवसायिकरणासाठी उद्योगाशी समन्वय साधून कसे कार्य करता येईल, हे स्पष्ट केले. आयआयटी दिल्लीचे प्रा. रंगन बॅनर्जी ययांनी दिल्ली तल्या अशा हब व्यतिरिक्त इतरत्र येथील हबच्या काही उपलब्धींची रूपरेषा सांगितली.

प्रत्येक केंद्र, हे विभाग आठ कंपनी असून, त्या यजमान संस्थेतील एक स्वायत्त घटक आहे. या केंद्रांना, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इतर सर्वांसाठीचे तंत्रज्ञान, या क्षेत्रात तंत्रज्ञान संशोधन,डेटा बँक आणि डेटा सर्विसेस, डेटा विश्लेषण, रोबोटिक्स आणि स्वयंचलित प्रणाली,सायबर सुरक्षा, तसेच भौतिक पायाभूत सुविधांसाठी सायबर सुरक्षा, इत्यादि. एनएमआयसीपीएस अभियानाचे उद्दिष्ट, संशोधन आणि विकास, प्रत्यक्ष उपयुक्त ठरू शकेल असे संशोधन आणि उत्पादन विकास, स्टार्ट अप्स ना जन्म आणि पाठबळ देणे आणि व्यावसायिकरण कारणे असे आहे.

NM-ICPS हे एक व्यापक मिशन आहे जे शैक्षणिक क्षेत्र, उद्योगक्षेत्र, सरकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि एक व्यवस्था तयार केली आहे त्यातील उद्योजकता वाढवते, त्याशिवाय, अद्यायवत कुशल मनुष्यबळ विकसित करते, प्रत्यक्ष उपयुक्त संशोधनाला प्रेरणा देते आणि CPS तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकरणाला प्रोत्साहन देते.

तंत्रज्ञान विकास, उद्योजकता विकास, मनुष्यबळ विकास, आणि आंतरराष्ट्रीय सहयोग अंतर्गत सर्व उपक्रम राबवून मिशन राबवले जात आहे. तंत्रज्ञानाचा विकास, सायबर फिजिकल सिस्टीम्स (CPS) आणि संबंधित तंत्रज्ञानामध्ये भाषांतरित दुरुस्त्या आणि व्यापारीकरण, भारतातील विशिष्ट राष्ट्रीय आणि प्रादेशिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी CPS तंत्रज्ञानाचा अवलंब, पुढील पिढीच्या कुशल मनुष्यबळाचे उत्पादन, हे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रत्यक्षात वापरता येईल अशा तंत्रज्ञानविषयक संशोधन ची व्यवस्था करणे, स्वयं उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे, स्टार्ट अप्स ची व्यवस्था विकसित कारणे, सीपीएस तंत्रज्ञानात, अद्ययावत तंत्रज्ञानावर भर देणे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण आणि इतर बाबतील भारताला इतर प्रगत देशांच्या बरोबरीने आणणे. या तंत्रज्ञानामुळे, आरोग्यसेवा, वाहतूक, शिक्षण, पायाभूत सुविधा इत्यादीसारख्या भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवता येऊ शकेल आणि इतर प्रगत देशांच्या बरोबरीत येण्यासाठी ही क्षेत्रे अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत प्रगतीची क्षेत्रे ठरू शकतील.

***

S.Pophale/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914799) Visitor Counter : 263


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil