विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारत जलद गतीने वाढणाऱ्या जैवतंत्रज्ञान स्टार्टअपसह जगातील प्रमुख जैव अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 07 APR 2023 1:33PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत जलद गतीने वाढणाऱ्या जैवतंत्रज्ञान स्टार्टअपसह जगातील प्रमुख जैव अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे असे केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री; (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एंटरप्रायझेस (एबीएलई) च्या 20 व्या वर्धापन दिन समारंभात ते आज  उद्घाटनपर भाषणावेळी बोलत होते.  भारताने मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या असून     कोवॅक्सीनच्या उत्पादनात वाढ केली आहे तसेच भविष्यातील लसींच्या सुरळीत विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, जेणेकरून आपला देश महामारीसाठी सज्ज राहू शकेल.

जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2022 मध्ये भारताने 40 व्या स्थानावर झेप घेतली आहे. आधी तो 81 व्या स्थानावर होता. आपण आता नजीकच्या काळात टॉप 25 मध्ये आणि भारत @ 100 द्वारे पहिल्या पाचमध्ये येण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय जवान, जय किसान जय विज्ञान या देशाच्या सदाबहार ब्रीदवाक्याला जय संशोधनाशी  जोडून नवोन्मेषाला मोठी चालना दिली आहे असेही त्यांनी सांगितले.

एबीएलई, स्थापनेच्या 20 व्या वर्षात तंत्रज्ञान, उत्पादने विकसित करण्यासाठी आणि जागतिक समुदायाला मोठ्या प्रमाणावर मदत करणारे उपाय प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते असे सिंह म्हणाले.  एबीएलईने 20 व्या वर्धापनदिनानिमित्त अनेबलर्स ऑफ इंडीयन बायोटेक  प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

जैव उद्योगाने 2030 पर्यंत 300 बिलियन अमेरीकी डॉलर्स जैव अर्थव्यवस्था आणि भारताच्या शताब्दी सोहळ्यावेळी - India@100 एक ट्रिलियन अमेरीकी डॉलर्स जैव अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्याकरता मदत करण्याचे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914631)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu