पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 8 आणि 9 एप्रिल रोजी तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटकला भेट देणार
पंतप्रधान तेलंगणात 11,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
पंतप्रधान सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील , या गाडीमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ जवळपास साडेतीन तासांनी कमी होईल
पंतप्रधान एम्स बीबीनगर तसेच सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचीही पायाभरणी करणार
पंतप्रधान चेन्नई विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे करणार उद्घाटन
पंतप्रधान चेन्नई-कोईमतूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
श्री रामकृष्ण मठाच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधान होणार सहभागी
पंतप्रधान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार तसेच मदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पलाही भेट देणार
पंतप्रधान ‘प्रोजेक्ट टायगरची 50 वर्षे साजरी करणाऱ्या ’ कार्यक्रमाचे करणार उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स आघाडीचाही करणार प्रारंभ
Posted On:
05 APR 2023 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 एप्रिल 2023 रोजी तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटकला भेट देणार आहेत.
पंतप्रधान 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:45 वाजता सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोहोचतील आणि सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी 12:15 च्या सुमारास, पंतप्रधान हैदराबाद येथील परेड ग्राउंडवर एका सार्वजनिक समारंभाला उपस्थित राहतील, यावेळी ते हैदराबादच्या एम्स बीबीनगरची पायाभरणी करतील. पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची देखील ते पायाभरणी करतील आणि रेल्वेशी संबंधित इतर विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.
दुपारी 3 च्या सुमारास पंतप्रधान चेन्नई विमानतळावर पोहोचतील, तिथे ते चेन्नई विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. दुपारी 4 वाजता, पंतप्रधान एमजीआर चेन्नई मध्य रेल्वे स्थानकात चेन्नई-कोईमतूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. या कार्यक्रमादरम्यान ते रेल्वेशी संबंधित इतर प्रकल्पांचे उद्घाटन करतील. संध्याकाळी 4:45 वाजता, पंतप्रधान चेन्नईतील श्री रामकृष्ण मठाच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होतील. संध्याकाळी 6:30 वाजता, पंतप्रधान चेन्नईच्या अल्स्ट्रॉम क्रिकेट मैदानावर एका सार्वजनिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील . यावेळी ते रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7:15 वाजता पंतप्रधान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देतील. मदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पलाही ते भेट देतील. सकाळी 11 च्या सुमारास पंतप्रधान म्हैसूर येथील कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठात आयोजित 'प्रोजेक्ट टायगरची 50 वर्षे' या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
तेलंगणामध्ये पंतप्रधान
पंतप्रधान तेलंगणामध्ये रु. 11,300 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.
सिकंदराबाद-तिरुपती ही वंदे भारत एक्स्प्रेस, आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या हैदराबादला भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुपतीला जोडणारी, तीन महिन्यांच्या अल्प कालावधीत तेलंगणामधून सुरू होणारी दुसरी वंदे भारत रेल्वेगाडी आहे.या रेल्वेगाडीमुळे दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे साडेतीन तासांनी कमी होईल आणि विशेषतः यात्रेकरू प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल.
रु. 720 कोटी खर्चून सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे नियोजन आहे. यामुळे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यासह सौंदर्यदृष्टीने रचना केलेल्या प्रतिष्ठित रेल्वे स्थानक इमारतीसह रेल्वेस्थानकाचे लक्षणीय परिवर्तन होईल. प्रवाशांना रेल्वेतून इतर मार्गांवर विना अडथळा स्थानांतरण करण्यासाठी पुनर्विकसित रेल्वेस्थानकामधे द्विस्तरीय छतावर प्रशस्त जागा असेल यामध्ये सर्व प्रवासी सुविधा एकाच ठिकाणी असतील आणि बहुविध कनेक्टिव्हिटी असेल.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान हैदराबाद - सिकंदराबाद या जुळ्या शहर क्षेत्रातील उपनगरी विभागात 13 नव्या बहुविध परिवहन सेवांना (एमएमटीएस ) हिरवा झेंडा दाखवतील. यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास पर्याय उपलब्ध होणार आहे. सिकंदराबाद-महबूबनगर रेल्वे प्रकल्पाच्या दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचेही त्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. सुमारे रु. 1,410 कोटी रुपये खर्चून 85 किलोमीटरहून अधिक अंतराचा हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प विनाअडथळा कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि रेल्वेगाडीचा सरासरी वेग वाढवण्यासाठी मदत करेल. एमजीआर चेन्नई रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान चेन्नई-कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील तसेच ते तंबरम आणि सेनगोट्टई यांच्या दरम्यानच्या एक्सप्रेस सेवेचा प्रारंभ करतील. कोईम्बतूर, तिरुवर आणि नागपट्टीनम जिल्ह्यांमधील रहिवाशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या थिरूथुरईपाँडी – अगस्थीयमपल्ली या टप्प्यातील डेमू सेवेला देखील हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करतील.
थिरूथुरईपाँडी आणि अगस्थीयमपल्ली या 37 किलोमीटर टप्प्याच्या गेज रुपांतराचे देखील उद्घाटन करतील, या कामासाठी सुमारे 294 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रूपांतरामुळे नागपट्टीनम जिल्ह्यातील अगस्थीयमपल्लीहून जेवणात वापरल्या जाणाऱ्या तसेच औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मिठाची वाहतूक अधिक सुलभरीत्या होऊ शकेल.
पंतप्रधान या दौऱ्यात, चेन्नई येथील रामकृष्ण मठाच्या 125व्या वर्धापन दिन सोहोळ्यात सहभागी होतील. वर्ष 1897 मध्ये स्वामी रामकृष्णानंद यांनी या रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या विविध मानवतावादी आणि समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर अध्यात्मिक संस्था आहेत.
चेन्नई येथील अल्स्ट्रोम क्रिकेट मैदानावर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान 3700 कोटी रुपये खर्चाच्या रस्ते प्रकल्पांची कोनशीला रचतील. या प्रकल्पांमध्ये मदुराई शहरातील 7.3 किलोमीटर लांबीची उन्नत मार्गिका आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 785 वरील 24.4 किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा समावेश आहे.सुमारे 2400 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामुळे तामिळनाडू आणि केरळ यांच्यातील आंतरराज्य जोडणी सुविधेला चालना मिळेल आणि मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, श्रीविल्लीपुथुर येथील अंदल मंदिर तसेच केरळमधील शबरीमाला मंदिर यांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी प्रवास सुखकर होण्याची शाश्वती होईल.
पंतप्रधानांची कर्नाटक भेट
कर्नाटक भेटीदरम्यान पंतप्रधान सकाळी बांदीपूर व्याघ्रप्रकल्पाला भेट देऊन तेथे संवर्धन उपक्रमांमध्ये सक्रीय कार्य करणारा अग्रेसर कर्मचारीवर्ग तसेच स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. तसेच ते यावेळी मदुमलाई व्याघ्रप्रकल्पातील थेप्पकडु हत्ती प्रकल्पाला भेट देऊन तेथे कार्यरत माहूत तसेच कवाडी यांच्याशी देखील संवाद साधतील. व्याघ्रप्रकल्पाच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन अभ्यासाच्या नुकत्याच संपलेल्या पाचव्या फेरीत उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या प्रकल्पांच्या संचालकांशी देखील पंतप्रधान मोदी संवाद साधतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी (आयबीसीए) ची स्थापना करतील. आशियामध्ये होणारी वन्य जीवांची शिकार तसेच या जीवांचा बेकायदेशीर व्यापार यांना दृढतेने आळा घालण्यासाठी तसेच या जीवांना असलेली मागणी संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जुलै 2019 मध्ये जागतिक नेत्यांच्या अशा प्रकारच्या आघाडीची स्थापना करण्याची मागणी केली होती. पंतप्रधानांच्या या संकल्पनेला अनुसरत या आघाडीची स्थापना करण्यात येत आहे. जगातील वाघ, सिंह,बिबट्या, हिमबिबट्या, पुमा, जग्वार आणि चित्ता या मार्जार कुळातील सहा प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यावर आयबीसीए लक्ष केंद्रित करणार असून या कामात या प्राण्यांच्या जाती ज्या देशांमध्ये आढळतात त्यांना सदस्यत्व देऊन त्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
हैदराबाद येथील संचलन मैदानावर आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान एम्स बीबीनगर, हैदराबादची पायाभरणी करतील. देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची ही साक्ष आहे. एम्स बिबीनगर रु. 1,350 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केले जात आहे. एम्स बिबीनगरची स्थापना हा तेलंगणातील लोकांना त्यांच्या घराजवळ सर्वसमावेशक, दर्जेदार आणि समग्र तृतीयक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान रु. 7,850 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील.या रस्ते प्रकल्पांमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही देशांची रस्ते जोडणी मजबूत होईल.हे रस्ते प्रकल्प तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमधील रस्ते कनेक्टिव्हीटी बळकट करतील आणि या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मदत करतील.
तामिळनाडूमध्ये पंतप्रधान
रु. 1260 कोटी खर्चून विकसित केलेल्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे (टप्पा -1) उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे विमानतळाची प्रवासी सेवा क्षमता प्रतिवर्ष 23 दशलक्ष प्रवासी (एमपीपीए ) वरून 30 एमपीपीएपर्यंत वाढेल.नवीन टर्मिनल हे स्थानिक तमिळ संस्कृतीचे एक उल्लेखनीय प्रतिबिंब आहे, ज्यात कोलाम, साडी, मंदिरे आणि नैसर्गिक परिसर अधोरेखित करणारे इतर घटक यांसारख्या पारंपरिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
* * *
S.Patil/Sushma/Sonal C/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914068)
Visitor Counter : 210
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam