आयुष मंत्रालय
दिब्रुगढ विद्यापीठ परिसरामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या योग महोत्सवाचा केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
01 APR 2023 7:10PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 75 दिवसांच्या उलट गणनेच्या निमित्ताने 7 एप्रिल 2023 रोजी दिब्रुगढ विद्यापीठ परिसरामध्ये ‘योग महोत्सव’ आयोजित करत आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी ,जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज दिब्रुगढ विद्यापीठातील कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाला भेट दिली.
केंद्रीय मंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांसह दिब्रुगड विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. जितेन हजारिका यांच्यासह विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपले जीवन सुधारण्यासाठी आयुषचे महत्त्व यापासून ते राष्ट्र उभारणीत विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी निर्माण केलेल्या संधींपर्यंत विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही विद्यार्थ्यांना योग महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912969)
आगंतुक पटल : 232