खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या ऊर्जा संक्रमणामध्ये वैविध्यपूर्ण आणि चक्राकार नवीकरणीय ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज पुरवठा साखळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

Posted On: 01 APR 2023 6:20PM by PIB Mumbai

 

भारताच्या G-20 कार्यगटाच्या दुसऱ्या ऊर्जा संक्रमण बैठकीचा एक भाग म्हणून, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, खाण मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालय 'विविधीकरण नवीकरणीय आणि दुर्मिळ खनिजे पुरवठा साखळी ते आधुनिक ऊर्जा संक्रमण ' या अधिकृत उपक्रमाचे आयोजन करणार आहेत. 3 एप्रिल 2023 रोजी गांधीनगर, गुजरात येथे. एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) आणि ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद (CEEW) द्वारे समर्थित हा कार्यक्रम, नवीकरणीय ऊर्जा (RE) आणि ऊर्जा संक्रमणासाठी महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी विविधीकरण आणि सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यात साखळी मूल्यातील चक्राकार व्यवस्थेचा समावेश असेल.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला आणि खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज उद्घाटनपर भाषण करतील आणि उद्योग क्षेत्रातील जगातील आघाडीच्या तज्ञांना बोलावून या कार्यक्रमासाठी शैक्षणिक आणि इतर गोष्टींच्या संदर्भात धोरण तयार करतील.

यानंतर डॉ अरुणाभ घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी, CEEW ह्यांच्या हस्ते - 'ऊर्जा संक्रमणासाठी लवचिक नवीकरणीय ऊर्जा पुरवठा साखळी विकसित करणे' आणि 'दुर्मिळ खनिज पुरवठा साखळीची अतिसंवेदनशीलतेच्या समस्येची हाताळणी करमे' या दोन CEEW अहवालांचे प्रकाशन केले जाईल. या कार्यक्रमात नूतनीकरणक्षम ऊर्जा पुरवठा साखळी सुरक्षित करणे आणि उत्पादन वाढवून आणि चक्राकार प्रक्रिया समाविष्ट करून मूल्य साखळी मजबूत करणे यावर दोन चर्चासत्रे होतील.

जागतिक आर्थिक विकास हा आक्रसणारे कार्बन अवकाश, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या तीव्रतेत वाढ, वाढत्या भू-राजकीय प्रतिकूलतेशी संबंधित असतो. जगाला कार्बनच्या बाबतीत निव्वळ-शून्य उत्सर्जनाच्या भवितव्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, 2021 आणि 2050 दरम्यान, सौर आणि पवन ऊर्जा क्षमता अनुक्रमे 17 आणि 10 पटीने वाढायला हवी. तसेच उर्जा आणि वाहन क्षेत्रात संक्रमण होण्यासाठी वार्षिक बॅटरी उपयोजन अनुक्रमे 50 पट आणि 28 पट वाढले पाहिजे. देश सौर, पवन, बॅटरी आणि हायड्रोजन सारख्या RE तंत्रज्ञानाच्या अखंड आणि परवडणाऱ्या पुरवठा साखळ्यांमध्ये प्रवेश सुरक्षित करू शकला तरच नवीकरणीय संसाधनांमध्ये जोखीम विरहित संक्रमण शक्य होईल.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912888) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu