संरक्षण मंत्रालय

व्हाईस एडमिरल अतुल आनंद यांनी स्वीकारला नेव्ही ऑपरेशन्सच्या महासंचालकपदाचा  (डी. जी. एन. ओ.) कार्यभार


व्हाईस एडमिरल अतुल आनंद यांनी एक एप्रिल 2023 रोजी (नेव्ही ऑपरेशन्स महासंचालकपदाचा [डायरेक्टर जनरल नेवल ऑपरेशन्स (डी. जी. एन. ओ.) ]कार्यभार स्वीकारला.

Posted On: 01 APR 2023 2:07PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत ते एक जानेवारी 1988 रोजी रुजू झाले. नॅशनल डिफेन्स अकॅडेमीच्या डेल्टा तुकडीच्या 71 व्या सत्राचे, तसेच बांग्लादेशातील मिरपूर इथल्या डिफेन्स सर्विसेस् अँड स्टाफ कॉलेज आणि नवी दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. अमेरिकेतील हवाई इथे असलेल्या एशिया पॅसिफिक सेंटर फॉर सेक्युरिटी स्टडीज् मधून प्रतिष्ठेचा मानला जाणारा सुरक्षाविषयक सहकार्याचा अभ्यासक्रम त्यांनी केला आहे. संरक्षण आणि नीती विषयक एम.फिल्. आणि एम. एस. सी., संरक्षणविषयक अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी आणि बी.एस.सी अशी त्यांची शैक्षणिक पात्रता आहे.

अतिविशिष्ट सेवा आणि विशिष्ट सेवा पदकांचे मानकरी असलेल्या अतुल आनंद यांनी नौदलातील कारकीर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यामध्ये टॉर्पिडो रिकव्हरीसाठी असलेले वाहन, आय.एन. एस. चातकसारख्या क्षेपणास्त्रवाहू जहाजांवरील पदांचा समावेश आहे. शारदा, रणविजय आणि ज्योती या जहाजांवर दिशादर्शक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी भूषवलेल्या महत्त्वाच्या पदांमध्ये नौदल कार्याचे संयुक्त संचालक, वेलिंग्टन इथल्या डिफेन्स सर्विसेस् स्टाफ कॉलेजचे संचालक, नौदल व्यूहरचना आणि कार्याचे मुख्य संचालक आदी विविध पदांचा समावेश आहे. नौदलाच्या संरक्षण मंत्रालयातील मुख्य कार्यालयातही त्यांनी नीती, संकल्पना आणि बदलविषयक विभागाचे मुख्य संचालक म्हणून काम केले आहे. तसेच, खडकवासला इथल्या नॅशनल डिफेन्स अकॅडेमी आणि कर्नाटक नौदल क्षेत्रात ध्वजाधिकारी म्हणून काम केले आहे.

***

S.Patil/R.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912857) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu