कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी पंचायती राज संस्थांच्या (पीआरआय) प्रतिनिधींना पंतप्रधान मोदींच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे केले आवाहन.
Posted On:
01 APR 2023 1:26PM by PIB Mumbai
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज पंचायती राज संस्थांच्या (पीआरआय) प्रतिनिधींना पंतप्रधान मोदींच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
उत्तर प्रदेशात अमरोहा जिल्ह्यातील पंचायती राज संस्था प्रतिनिधींची बैठक डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या लोकाभिमुख उपक्रम आणि कार्यक्रमांचे सर्वात महत्वाचे संदेशवाहक पीआरआय प्रतिनिधी बनू शकतात कारण ते थेट तळागाळातील लोकांच्या संपर्कात असतात असे त्यांनी सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली पंचायतींना सतत सक्षम केले जात आहे असेही ते म्हणाले.
लोकांमधून निवडून आल्याने पीआरआय प्रतिनिधींना समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सर्वात गरजू कोण आहेत हे जाणून घेता येते आणि कोणत्याही मतपेढीचा विचार न करता लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतील याची ते खातरजमा करू शकतात हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “देशाने 100 टक्के लाभार्थींपर्यंत लाभ पोहचवण्याचा संकल्प केला आहे. जेव्हा योजनांचे फायदे 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचतात तेव्हा तुष्टीकरणाचे राजकारण संपते. त्यासाठी जागा उरत नाही असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.”
विकास कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याच्या गरजेवर भर देत, गुणवत्तेशी तडजोड न करता प्रकल्प जलद पूर्ण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा अवलंब करण्याची गरज डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केली.
तळागाळापर्यंत लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभांबद्दल लोकांना जागरूक करण्याकरता पीआरआय प्रतिनिधींच्या प्रयत्नांचे डॉ जितेंद्र सिंह यांनी कौतुक केले. ग्रामीण भारतात सरकारी योजनांची जास्तीत जास्त व्याप्ती आणि त्यांचा उपयोग करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन पीआरआय प्रतिनिधींनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून कोणीही वंचित राहता कामा नये असे ते म्हणाले.
***
S.Patil/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912838)
Visitor Counter : 158