परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

केरळमधील कुमारकोम येथे दुसऱ्या जी 20 शेर्पा बैठकीचे (30 मार्च ते 2 एप्रिल 2023) आयोजन

Posted On: 29 MAR 2023 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या जी 20 अध्यक्षीय कार्यकाळातील दुसऱ्या जी 20 शेर्पा बैठकीचे आयोजन 30 मार्च ते 2 एप्रिल 2023 या कालावधीत केरळमधील कुमारकोम या निसर्गरम्य गावात करण्यात आले आहे. जी 20 सदस्य देशांच्या 120 हून अधिक प्रतिनिधींचा चार दिवसांचा मेळावा, 9 निमंत्रित देश आणि विविध आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना जी 20 च्या आर्थिक आणि विकासात्मक प्राधान्यांबद्दल तसेच समकालीन जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय चर्चा करतील. धोरणात्मक दृष्टीकोन आणि ठोस अंमलबजावणी या दोन्हींवर चर्चा होईल.

दुसरी शेर्पा बैठक जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर काम करेल आणि शेर्पा ट्रॅकमध्ये 13 कार्यगटांच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा अंतर्भाव करेल. तसेच, 11 सहभागी गट आणि 4 उपक्रम (संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलन किंवा आरआयआयजी, सक्षमीकरण, अंतराळ अर्थव्यवस्था नेत्यांची बैठक किंवा एसईएलएम आणि मुख्य वैज्ञानिक सल्लागार गोलमेज परिषद किंवा सीएसएआर) देखील नागरी समाज, खासगी क्षेत्र, शैक्षणिक, महिला, युवक, वैज्ञानिक प्रगती आणि संशोधन यांच्या दृष्टीकोनातून धोरण शिफारशी पुरवत आहेत. शेर्पा बैठकीचे विचारमंथन विविध शेर्पा ट्रॅक आणि वित्तीय ट्रॅक बैठकीचे परिणाम पुढे नेतील आणि सप्टेंबर 2023 मध्ये नवी दिल्ली येथील शिखर बैठकीत स्वीकारल्या जाणार्‍या नेत्यांच्या घोषणेचा आधार बनतील.

30 मार्च 2023 रोजी (i) डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय); आणि (ii) हरित विकास या दोन उच्चस्तरीय पूरक उपक्रमांनी बैठकीची सुरुवात होईल. नॅस्कॉम, बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि डिजिटल इम्पॅक्ट अलायन्स (डीआयएएल) यांच्या भागीदारीत आयोजित करण्यात येणार्‍या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा पूरक उपक्रमाची सुरुवात सर्व जी 20 प्रतिनिधींसाठी उत्साहवर्धक डिजिटल अनुभवाने होईल, त्यानंतर विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक डीपीआय तयार करण्यातील जागतिक आव्हाने आणि संधींवर बहुविध शिष्टमंडळ स्तरीय चर्चासत्रे होतील.

प्रतिनिधींना 'चर्चायम आहारावम' (रात्रीच्या भोजनादरम्यान संभाषण) आणि सांस्कृतिक कार्यक्रम, मिनी थ्रिसूर पूरम अनुभव, पारंपरिक ओणम साध्य माध्यान्ह भोजन आणि चाय वल्लोम (बोटीवरील चहा) यासह इतर अनुभवांसाठी देखील आमंत्रित केले जाईल, ज्यामुळे त्यांना राज्य सरकारच्या निकट सहकार्याने केरळमधील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची अनोखी संधी मिळेल.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912029) Visitor Counter : 185