नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांच्या हस्ते अहमदाबाद ते गॅटविक दरम्यान थेट विमानसेवेचा प्रारंभ
हे विमान आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करेल
Posted On:
28 MAR 2023 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज अहमदाबाद ते गॅटविक दरम्यान थेट विमानसेवेचा आरंभ केला. अहमदाबाद आणि गॅटविक दरम्यानचे विना थांबा विमान आजपासून एअर इंडियाद्वारे चालवले जाईल.
Flt No.
|
From
|
To
|
Freq.
|
Dep. Time (LT)
|
Arr. Time (LT)
|
AI171
|
AMD
|
LGW
|
Thrice a week
|
1150
|
1640
|
AI172
|
LGW
|
AMD
|
Thrice a week
|
2000
|
0850+1
|
या नवीन हवाई कनेक्टिव्हिटीमुळे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रासाठी नव्या संधी उपलब्ध होतील आणि यूकेमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत होईल, असे ज्योतिरादित्य एम सिंधिया सांगितले. सध्या 50 लाख देशांतर्गत आणि 25 लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाताळण्याची अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता आहे. अहमदाबादची प्रवासी क्षमता 1.60 कोटींपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी अहमदाबादच्या कनेक्टिव्हिटीसंदर्भात बोलताना सांगितले.
2013-14 मध्ये, अहमदाबाद विमान सेवेद्वारे केवळ 20 ठिकाणांशी जोडले गेले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या 9 वर्षांमध्ये अह्मदाबादची कनेक्टिव्हिटी 57 ठिकाणांपर्यंत वाढली आहे. गेल्या 9 वर्षात, अहमदाबादहून साप्ताहिक विमानसेवा दर आठवड्याला 980 उड्डाणांवरून 2036 पर्यंत 128% वाढली आहे. असेही ते म्हणाले.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1911463)
Visitor Counter : 165