ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (टप्पा -II) अंतर्गत सरकारकडून 39600 मेगावॅट देशांतर्गत सौर पीव्ही मॉड्युल उत्पादन क्षमतेचे वितरण


उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेद्वारे (टप्पा -II) 93041 कोटींची गुंतवणूक अपेक्षित ;एक लाखाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

Posted On: 28 MAR 2023 3:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मार्च 2023

उच्च कार्यक्षमतेच्या सौर पीव्ही मॉड्यूल्ससाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय ) (टप्पा -II), सरकारने एकूण रु. 14,007 कोटी खर्चासह एकूण 39,600 देशांतर्गत सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादन क्षमता 11 कंपन्यांना वितरीत केली आहे . एकूण 7400 मेगावॅट  उत्पादन क्षमता ऑक्टोबर 2024 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे तर  एप्रिल 2025 पर्यंत 16,800 मेगावॅट क्षमता आणि एप्रिल 2026 पर्यंत उर्वरित 15,400 मेगावॅट क्षमता कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात  93,041 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून एकूण 1,01,487 रोजगार  निर्माण होतील यामध्ये  35,010 लोकांना प्रत्यक्ष  आणि 66,477 लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल. कंपन्यांची यादी परिशिष्ट - अ  मध्ये आहे.

उच्च तंत्रज्ञान सौर  पीव्ही मॉड्युल्सच्या उत्पादनाच्या मूल्य साखळीमध्ये भारताची कामगिरी उत्तम आहे आणि यातील क्षमता वाढ हे सौर उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे सांगत केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी पीएलआय योजनेचे यश अधोरेखित केले. पुढील 3 वर्षांत सुमारे 48 गिगावॅट देशांतर्गत मॉड्यूल उत्पादन क्षमतेसह "भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थितीमध्ये उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना ही महत्वपूर्ण परिवर्तन घडवणारी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले. या योजनेमुळे केवळ जागतिक पुरवठा साखळीला बसलेल्या हादऱ्यांचा  प्रभाव कमी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना चालना तर मिळाली आहेच ,मात्र  माननीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार आपले आयातीवरील अवलंबित्व देखील कमी केले आहे, असे सिंह यांनी सांगितले.

नोव्हेंबर-डिसेंबर, 2022 मध्ये योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण 8737 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचे वितरण करण्यात आले. दोन टप्प्यांचा एकत्रित विचार करतासरकारच्या 18,500 कोटी रुपयांहून अधिक एकत्रित पाठबळासह उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेंतर्गत वितरीत केलेली एकूण देशांतर्गत सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादन क्षमता, 48,337 मेगावॅट आहे.

परिशिष्ट - अ   

Capacity awarded under PLI Scheme (Tranche-II)

P+W+C+M Basket

Sr. No

Name of Bidder

Manufacturing Capacity (MW)

1

Indosol

6000

2

Reliance

6000

3

First Solar

3400

Total

15400

W+C+M Basket

Sr. No.

Name of Bidder

Manufacturing Capacity (MW)

1

Waaree

6000

2

Avaada

3000

3

ReNew

4800

4

JSW

1000

5

Grew

2000

Total

16800

C+M Basket

Sr. No

Name of Bidder

Manufacturing Capacity (MW)

1

Vikram

2400

2

AMPIN

1000

3

Tata Power Solar

4000

Total

7400

Grand totals

39600

 

 

 

 

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911429) Visitor Counter : 287


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia