नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
सर्वाधिक वार्षिक कर्ज वितरण आणि मंजुरीची गतवर्षीची मर्यादा ईरेडा ने ओलांडली
नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये,16,320 कोटी रुपयांच्या कर्ज वितरण आणि 32,578 कोटी रुपयांच्या कर्जाला दिली मंजूरी
Posted On:
28 MAR 2023 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
ईरेडा अर्थात नवी आणि नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था ने आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत 16,320 रुपयांचे कर्ज वितरित करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
यापूर्वी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ईर्डाने सर्वाधिक 16,071कोटी रुपयांच्या वार्षिक कर्ज वितरणाला मंजूरी दिली होती.तसेच गतवर्षी सर्वाधिक 23,921 कोटी रुपये इतके वार्षिक कर्ज मंजूर (आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कर्ज) केले होते, त्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात 32,578 कोटी (27 मार्च 2023 पर्यंत) पर्यंत कर्ज मंजुरी दिली आहे.
ही कंपनी देशभरातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना स्पर्धात्मक दराने आर्थिक सहाय्य देऊन भारताच्या शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा भविष्याच्या संक्रमणात सक्रियपणे योगदान देत आहे.
या यशाबद्दल बोलताना, ईरेडा चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदिप कुमार दास म्हणाले, " हे विक्रमी कर्जवाटप आणि मंजुरी, कंपनीच्या भारतातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याच्या आणि वित्तपुरवठा करण्याच्या मोहिमेप्रती असलेली बांधिलकी दर्शवत आहे, यामुळे देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची वित्तीय संस्था म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत होईल,असा आम्हाला विश्वास वाटतो "
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1911401)
Visitor Counter : 186