वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) मुंबईतील पहिल्या बैठकी दरम्यान, येत्या 28 मार्च 2023 रोजी व्यापार आणि वित्तीय सहकार्य विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Posted On: 27 MAR 2023 3:31PM by PIB Mumbai

मुंबई, 27 मार्च 2023

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत, व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची पहिली बैठक (TIWG) येत्या 28 मार्च ते 30 मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत, जी-20 सदस्य गटांचे 100 पेक्षा अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थाचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीवर होणाऱ्या चर्चेतही ते भाग घेणार आहेत.

बैठकीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच 28 मार्च रोजी, ‘जी-20  व्यापार आणि वित्तीय सहकार्य”  या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. ही परिषद, इंडिया एक्झिम बँक आणि एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) या वित्तीय संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे.

व्यापाराला होणारा अर्थपुरवठा, आर्थिक विकासाला पाठबळ देत असतो तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रवाह वाहता ठेवण्याचा तो अविभाज्य घटक असतो. त्याद्वारे, बाजारात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यास, त्यातून उद्भवणाऱ्या जोखीमांचा सामना करता येतो. जगभरातील एकूण व्यापारापैकी, सुमारे 80 टक्के व्यापारासाठी, विशिष्ट स्वरूपाच्या व्यापारी वित्तसंस्थांचा उपयोग करुन घेतला जातो. यात, हमीपत्र, पुरवठा साखळीला वित्तपुरवठा करणे, इनवॉइस मध्ये सवलत आणि रीसिव्हेबल वित्तपुरवठा अशा घटकांचा समावेश आहे.जागतिक व्यापारी वित्त पुरवण्यात, अनेक बाजुंचा संबंध असतो. यात बँका, व्यापार आणि वित्तीय कंपन्या, निर्यात पतसंस्था,विमा संस्था, आयातदार आणि निर्यातदार असे सगळे घटक असतात.

आंतरराष्ट्रीय व्यापारात वित्तपुरवठा हा सर्वाधिक महत्वाचा असतो. 2020 मध्ये व्यापारी वित्तीय व्यवहारातील 9 ट्रिलियन डॉलर्सचा वित्तपुरवठा मोठ्या जागतिक बँकांकडून झाला होता, असा अंदाज आहे . मात्र, असे असले तरीही,जगभरात  व्यापारी वित्तपुरवठ्यातील तफावत वाढते आहे. आशियाई विकास बँकेच्या (ADB) अंदाजानुसार, 2018 मध्ये 1.5 ट्रिलियन डॉलर्सची ही तफावत, आता  2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढली आहे. म्हणूनच आता अशा कृती-प्रवण उपायांवर गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे.जेणेकरून आपण ही आर्थिक तफावत कमी करु  शकू आणि डिजिटल साधने आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करून ते करणे अधिक सुलभ बनवू शकू. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग- ज्यामुळे अनेकांच्या उपजीविका सुरु असून, विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही देशातील अर्थव्यवस्थांसाठी जे जागतिक आर्थिक विकासात मोठे योगदान देतात, त्यांच्यावर, या व्यापारी वित्तपुरवठ्यातील  वाढलेल्या तफावतीचा विपरीत परिणाम झाला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर या परिषदेत दोन प्रमुख सत्रे होणार आहेत. पहिल्या सत्रात, व्यापार आणि वित्तपुरवठ्यातील तफावत कमी करण्यात, बँका, वित्तीय संस्था, विकासविषयक  वित्तीय पुरवठा संस्था आणि निर्यात हमी संस्था, अशा सगळ्या संस्थांची भूमिका अधोरेखित केली जाईल. तर दुसऱ्या सत्रात, डिजिटलीकरण आणि फीनटेक अर्थात आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर  याद्वारे, व्यापार वित्तपुरवठ्यासाठी सुलभता आणि गती कशी मिळू शकेल, या विषयावर मंथन  होईल.

सत्र 1: व्यापार विषयक वित्त पुरवठ्यातील  तफावत दूर  करण्यात बँका, वित्तीय संस्था, विकास वित्त संस्था आणि निर्यात पत संस्था यांची  भूमिका.

सूत्रसंचालक - लता वेंकटेश, कार्यकारी संपादक, CNBC TV 18

पॅनेल सदस्य:  स्टीव्हन बेक, व्यापार वित्त प्रमुख, एडीबी ; प्रा. अँड्रियास क्लासेन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय विषयाचे  प्राध्यापक आणि संचालक, IFTI, ऑफेनबर्ग विद्यापीठ, जर्मनी; गौरव भटनागर, व्यवस्थापकीय संचालक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक

पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यापार वित्त पुरवठा यामधील विद्यमान कल आणि त्यांच्या भविष्यातील संधी  यांचा सूक्ष्म आढावा  घेतला जाईल. चर्चेतील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

  1. विकसनशील देशांमधील महामारी आणि वाढत्या आयात खर्चाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यापार वित्तपुरवठा मधील सध्याचा कल
  2. खाजगी क्षेत्रातला कमी कर्जपुरवठा आणि बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कमाल कर्ज मर्यादेत महागाईमुळे घट यासह व्यापार वित्त पुरवठा मधील तफावतीचे कारण.
  3. व्यापार वित्त पुरवठा मजबूत करण्यात निर्यात पत संस्थांची भूमिका

सत्र 2: डिजिटायझेशन आणि फिनटेक सोल्यूशन्सला गती दिल्यास व्यापार वित्तपुरवठा सुगम्य होऊ शकतो

सूत्रसंचालक - तमन्ना इनामदार, टाइम्स समूह

पॅनेल सदस्य : जॉन ड्रमंड, ओईसीडीच्या सेवा विभागातील व्यापार प्रमुख; फरीद अलसाली, सौदी अरेबियाचे  डेप्युटी गव्हर्नर,आंतरराष्ट्रीय संघटना  आणि करार; केतन गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रीसिव्हेबलएक्सचेंज ऑफ इंडीया लिमिटेड

या सत्रादरम्यान, व्यापार विषयक वित्त पुरवठ्याच्या  डिजिटलायझेशनमधील सध्याचे कल आणि कंपन्यांसाठी, विशेषत: एमएसएमईसाठी व्यापार विषयक वित्त पुरवठा सुलभ करण्यासाठी नवोन्मेष आणि कार्यक्षमतेला यामुळे कशा प्रकारे  गती मिळेल यावर विस्तृत चर्चा केली जाईल.

या चर्चेत सध्याच्या आणि उदयोन्मुख फिनटेक सोल्यूशन्सवर देखील विचार विनिमय होईल ज्यामुळे सानुकूलित कर्जपुरवठ्यासंबंधी  निर्णय घेण्यास तसेच एमएसएमईसाठी व्यापार संबंधी वित्तपुरवठा वाढविण्यात मदत होऊ शकेल. काही विशिष्ट चर्चांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश असेल:

  1. संपूर्ण व्यापार परिसंस्था सुधारण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी अनेक भागधारकांसोबत काम करून व्यापार विषयक वित्त पुरवठ्याचे डिजिटलायझेशन करण्याची गरज
  2. अंमलबजावणीचा वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी एमएसएमईच्या डिजिटलायझेशनची व्याप्ती आणि खर्चिक सेवांमुळे आणि सायबर सुरक्षा जोखीम कमी करण्याच्या धोरणांच्या खर्चामुळे उदभवणारे मोठे अडथळे लक्षात घेऊन कमी-मूल्य किंवा एकल व्यवहारांसाठी वित्त पुरवठ्यामध्ये नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे
  3. वित्तीय तंत्रज्ञानातील उदयोन्मुख उपाय, उदा. नेटवर्क डेटा, रिअल-टाइम पेमेंट , SaaS आधारित तंत्रज्ञान आणि ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन इ.

 
JPS/RA/SK/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911127) Visitor Counter : 476