कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हिरानगर इथे, जिल्हा प्रशासन आणि पीआरआय अर्थात पंचायत राज संस्थांच्या प्रतिनिधींसोबत घेतला ‘लोक दरबार’, लोकांच्या समस्या ऐकून,  जागच्या जागेवर, समस्यांच्या त्वरीत निवारणासाठी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश

Posted On: 26 MAR 2023 6:00PM by PIB Mumbai

 

राज्यकारभार लोकांच्या दारापर्यंत घेऊन जाणं, शेवटच्या रांगेतील शेवटच्या म्हणजेच तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच शक्य आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञानराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनासह 'लोक दरबार' आयोजित करुन लोकांच्या समस्या तात्काळ जागेवर सोडवण्यावर मोदी यांनी भर दिला आहे, असं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मिर मध्ये कठुआ जिल्हा मुख्यालयाबाहेर हिरानगर इथे आयोजित लोक दरबारात’  डॉ जितेंद्र सिंह बोलत होते.

जिल्हा प्रशासनासोबत आयोजित केलेल्या या लोकदरबारात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, "राज्यकारभार हा केवळ जिल्हा मुख्यालयापुरताच मर्यादीत राहता कामा नये. नेहमीची ही पद्धत सोडूनकाल रामनगर आणि आज हिरानगर प्रमाणे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या दारापर्यंत जायला हवे". असं  केलं तरच जनतेचे प्रश्न, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने  जागेवरच ताबडतोब सोडवता येतील, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला आहे असं सांगून डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, पूर्वीच्या सरकारच्या काळात, सीमावर्ती जिल्ह्यांसह यापूर्वी दुर्लक्षित राहिलेले देशातील भाग, आता मात्र देशासाठी आदर्श बनले आहेत. देशातील विकास आणि उत्तम राज्यकारभाराचं प्रतिक ठरलेला कठुआ हा सीमावर्ती जिल्हा म्हणजे याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे, असंही डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच सीमावर्ती भागात शेकडो एकर जमीन लागवडीखाली आणून कठुआमधील सीमावासीयांच्या चेहऱ्यावर हरवलेले हास्य परत आणलं आहे असं  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.  हे केवळ, 'सबका साथ, सबका विकास' अर्थात सर्वांचं सहकार्य-सर्वांचा विकास या मंत्रावर विश्वास बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारच्या काळातच शक्य झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कठुआमध्ये झालेल्या विविध विकासकामांची माहिती देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, कठुआ आज भारतातील विकासाचा एक आदर्श नमुना मानला जात आहे.  हे उत्तर भारतातील पहिलं बायोटेक पार्क अर्थात जैव तंत्र उद्यान आहे. ४० वर्षांनंतर  पुनरुज्जीवीत झालेला शाहपूर-कांडी प्रकल्प, उत्तर भारतातील अटल सेतू हा केबल म्हणजे अजस्त्र पोलादी दोरखंडांवर  पेललेला पहिला पूल, केरियन-गंड्याल इथला जम्मू-काश्मीरमधील  पहिला आंतरराज्य पूल, कठुआ मार्गे दिल्ली ते कटरा हा उत्तर भारतातील पहिला दृतगती महामार्गाचा पट्टा, चत्तरगळा बोगदा मार्गे  लखनपूर-बानी-बसोहली-डोडा, हा नवीन राष्ट्रीय महामार्गमेगा क्विंटल क्षमतेच्या बीज प्रक्रिया केंद्रासारखे शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात मदत करणारे प्रकल्प, केंद्रीय अनुदानित सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, केंद्रीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयं, पदवी महाविद्यालयं, अशा सर्व पायाभूत सुविधांनी युक्त कठुआ हे देशातील विकासाचं प्रतीक बनलं आहे, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.

***

G.Chippalkatti/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910935) Visitor Counter : 111