पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी दिलेल्या मिशन लाईफ संदेशाविषयी ईआईएसीपीकडून जनजागृती


सुमारे 59,500 लोकांना वसुंधरेची निगा राखण्यासाठी केले प्रेरित

Posted On: 26 MAR 2023 10:28AM by PIB Mumbai

 

दिल्ली, उत्तराखंड आणि पंजाबमधील पर्यावरण माहिती, जागरूकता, क्षमता बांधणी आणि उपजीविका कार्यक्रम, कार्यक्रम केंद्रे आणि संसाधन भागीदार (ईआयएसीपी पीसी -आरपी) द्वारे मिशन लाइफला प्रोत्साहन देणारा पाच दिवसीय जनजागृती कार्यक्रम 20-24 मार्च 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले मिशन लाइफ पर्यावरणाबाबत जागरूक राहण्यावर, अपव्यय करण्याऐवजी जागरूक आणि जाणीवपूर्वक वापराला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब आणि प्रचार करण्यासाठी वचनबद्ध असणाऱ्या प्रो-प्लॅनेट पीपल (पी3) नामक व्यक्तींचे जागतिक नेटवर्क तयार करणे.

सुमारे 59,500 लोकांनी (युट्यूब द्वारे 2000 थेट सहभागींसह) ईआयएसीपी द्वारे आयोजित केलेल्या मिशन लाईफ आणि त्याच्या संकल्पनेवरील जागरूकता कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. स्थानिक समुदाय आणि विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हरिद्वार, ऋषिकेश आणि डेहराडून येथे जागरूकता उपक्रम आयोजित केले गेले. या कार्यक्रमाने लोकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यास आणि जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी वचनबद्ध असलेल्या पर्यावरणाबाबत जागरूक व्यक्तींचे जागतिक नेटवर्क तयार करण्यास प्रेरित केले.

जागतिक वन्यजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ईआयएसीपी, जेएनयू ईआयएसीपी, आयआयएचएच सुलभ ईआयएसीपी पीसी-आरपी, एसपीए ईआयएसीपी पीसी -आरपी, सीपीसीबी ईआयएसीपी पीसी -आरपी, एनसीएपी (राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम) चमू यासह युकेपीसीबी ईआयएसीपी पीसी -आरपी, एफआरआय ईआयएसीपी पीसी -आरपी, आणि पंजाब ईआयएसीपी पीसी केंद्र यासारख्या विविध ईआयएसीपी पीसी -आरपी आणि केंद्रांद्वारे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1910924) Visitor Counter : 185