सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यकारक उपकरणे देण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून (DEPwD) 9 राज्यांमध्ये 17 ठिकाणी सामाजिक अधिकारिता शिबिरांचे आयोजन

Posted On: 25 MAR 2023 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2023

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगाना मदत आणि सहाय्यकारी उपकरणांच्या खरेदीसाठी पाठबळ (ADIP) या योजनेंतर्गत मदत आणि सहाय्यकारी उपकरणांचे वितरण करण्यासाठी देशात 9 राज्यांमध्ये 17 ठिकाणी, सामाजिक अधिकारिता शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये 13,500 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यकारी उपकरणे देण्यात आली. या शिबिरांच्या भव्य कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशात दातिया जिल्ह्यात स्टेडियम ग्राऊंडवर करण्यात आले होते आणि या मुख्य केंद्रासोबत इतर ठिकाणी होत असलेले सर्व कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडण्यात आले होते.  

यावेळी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राला अनुसरून आमच्या मंत्रालयांतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभाग दिव्यांगांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या समग्र विकासासाठी एक समावेशक आणि त्यांना सहजतेने हाताळणी करता येईल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी विविध केंद्रीकृत योजनांची अंमलबजावणी करत आहे.

विभागाने  ‘अर्जुन’ हे पोर्टल तयार केले असून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यकारी उपकरणांची ऑनलाईन पद्धतीने मागणी नोंदवण्यासाठी ते मदत करेल आणि कोणत्याही उपकरणांमध्ये काही दोष निर्माण झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी तक्रार देखील नोंदवता येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

भारतीय सांकेतिक भाषा(ISL)विषयक संशोधन आणि प्रशिक्षणासाठी दिल्लीमध्ये एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली आहे.10,000 शब्दांचा समावेश असलेली आयएसएल डिक्शनरी विकसित करण्यात आली असून मूक आणि बधिर व्यक्तींना याचा चांगला उपयोग होत आहे, असे त्यांनी सांगितले.

दातियामध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर 16 ठिकाणी वितरण शिबिरे होती, यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा, गुजरातमधील वडोदरा, छोटा उदयपूर आणि सूरत या ठिकाणांचा समावेश होता.  

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910811) Visitor Counter : 138