रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नितीन गडकरी यांच्या हस्ते झारखंड मधील रांची येथे 9400 कोटी रुपयांच्या 21 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
Posted On:
23 MAR 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज झारखंडमधील रांची येथील धुर्वा येथे 9400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 532 किमी लांबीच्या 21 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

गडकरी म्हणाले की, रांची ते वाराणसी 260 किमीचा 4-पदरी इंटर-कॉरिडॉर 7000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला असून, रांची ते वाराणसी हे अंतर 5 तासांत कापता येईल. 635 किमीच्या 4-पदरी रायपूर-धनबाद इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे कोळसा, पोलाद , सिमेंट आणि इतर खनिजांची वाहतूक सुलभ होईल असे ते म्हणाले .

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1910117)