उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शहीद दिवसानिमित्त सरदार भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली
Posted On:
23 MAR 2023 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2023
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी शहीद दिवसानिमित्त राज्यसभेत केलेल्या भाषणात सरदार भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली.
या हुताम्यांना "आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक " असे संबोधत त्यांचे हौतात्म्य हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक मैलाचा दगड आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. त्यांनी राष्ट्रासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे मुक्त भारतामध्ये नागरिकांना त्यांच्या लोकशाही मूल्यांची जोपासना करण्याचा मार्ग मोकळा झाला, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
या हुतात्म्यांनी ज्या मूल्यांसाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली, त्या मूल्यांचा अंगीकार प्रत्येक देशवासियाने करावा, असे आवाहन धनखड यांनी केले. या शूर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याप्रती असलेली आदरभावना व्यक्त करण्यासाठी राज्यसभेतील सर्व सदस्यांनी उठून उभे राहावे आणि मौन पाळावे अशी विनंती त्यांनी केली.
आपल्या निवेदनात उपराष्ट्रपती म्हणाले;
“माननीय सदस्यगण, आज भारताचे तीन महान सुपुत्र सरदार भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याला 92 वर्ष पूर्ण होत आहेत. 1931 मध्ये आजच्याच दिवशी स्वतंत्रलढ्यातील या नायकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
आपल्या तरुणवयात त्यांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान स्वातंत्र्यलढ्यातील एक ऐतिहासिक घटना ठरली. प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि लोकशाही मुल्यांनी युक्त जीवन जगता यावे, यासाठी त्यांनी हा बलिदानाचा मार्ग स्वीकारला. त्यांचा वारसा सर्वांसाठी प्रेरणादायी आणि उद्बोधक ठरेल.
त्यांनी सर्वांसमोर राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याप्रती असलेल्या सर्वोच्च बांधिलकीचे उदाहरण ठेवले आहे. या हुतात्म्यांनी ज्या मूल्यांसाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली, त्या मूल्यांना जपण्याचा आणि त्यांचा अंगिकार करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया. भारताला नेहमी प्रथम ठेवण्याची प्रतिज्ञा करूया. प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे जीवन व्यतीत करता यावे, यासाठी त्यांनी हौतात्म्याचा मार्ग स्वीकारला.”
उपराष्ट्रपतींनी आज राज्यसभेत शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना त्यांच्या 92 व्या हुतात्मा दिनी आदरांजली वाहिली.
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1909983)
Visitor Counter : 180