संरक्षण मंत्रालय
सैन्य दलाच्या शिध्यामध्ये भरड धान्यांचा समावेश
Posted On:
22 MAR 2023 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याच्या निमित्ताने भरड धान्याच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशाने, भारतीय सैन्यदलाने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये भरड धान्याचा समावेश केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल अर्ध्या शतकांनंतर, सैन्यांना देशी आणि पारंपारिक धान्यांचा पुरवठा सुनिश्चित होईल. जो गव्हाच्या पिठाच्या पुरवठ्यामुळे बंद करण्यात आला होता.
या निर्णयामुळे भरड धान्य आता सर्व श्रेणींच्या सैनिकांच्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग बनेल.
या संदर्भात सन 2023-24 पासून सेवेत भरती होणार्या सैनिकांसाठी पात्र रेशनमध्ये कडधान्यांच्या (तांदूळ आणि गव्हाचे पीठ) 25 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेले भरड धान्य खरेदी करण्यासाठी सरकारची मंजुरी मागण्यात आली होती . खरेदी आणि वितरण हे उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करून आणि मागणी केल्याच्या प्रमाणावर आधारित असेल. बाजरी, ज्वारी आणि नाचणी या बाजरीच्या पिठाच्या तीन लोकप्रिय जाती प्राधान्यक्रमानुसार सैनिकांना दिल्या जातील.
याशिवाय, बाराखाने, कॅन्टीन आणि घरच्या स्वयंपाकात भरड धान्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
* * *
S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909568)
Visitor Counter : 187